Homeचिट चॅटतायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत...

तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत आयुष आणि स्वराज सकपाळला सुवर्णपदके

हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या ५व्या खुल्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत ‘खेलो तायक्वांदो’ अकॅडमीच्या आयुष सपकाळ आणि स्वराज सकपाळ या दोन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली. आयुष सपकाळने १७ वर्षांखालील ४८ किलो वजनी गटात, तर स्वराज सकपाळने १४ वर्षांखालील ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. आयुषने उपांत्य फेरीत दिल्लीच्या खेळाडूवर तर अंतिम सामन्यात बेंगळुरूच्या खेळाडूला आरामात पराभूत केले. स्वराजनेही गुजरातच्या खेळाडूला उपांत्य फेरीत आणि अंतिम सामन्यात बिहारच्या खेळाडूविरुद्ध थरारक विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

आयुष हा सध्या मुंबईतल्या गुरुनानक खालसा कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत आहे. तो गेली ८ वर्षे तायक्वांदोचे धडे गिरवत आहे. स्वराज हा आय.ई.एस. वि. एन. सुळे स्कूल, दहिसर येथील नववीचा विद्यार्थी असून तोही पाच वर्षांपासून तायक्वांदो खेळात चमक दाखवतोय. या दोघांनी राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवून ‘खेलो तायक्वांदो’ अकॅडमीसह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. या ‌दोघांना प्रशिक्षक राजेश मुराव, तुषार पाटील आणि कार्तिकेय नायडू यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content