Homeएनसर्कलमहिला दिनानिमित्त लाभ...

महिला दिनानिमित्त लाभ घ्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचा!

8 मार्चला असणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गोवा टपाल विभागाने महिलांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.  महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच बचत संस्कृतीला चालना देण्यासाठी, केन्द्र सरकारने महिलांसाठी लघु बचत योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 आणली आहे. केवळ महिलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणेच नव्हे तर मुलींचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा उद्देश असलेल्या या योजनेचा लाभ जवळच्या टपाल कार्यालयाच्या माध्यमातून घेता येऊ शकतो.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 ही योजना महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने अनेक फायदे देते. महिलांना स्वतःच्या नावे किंवा पालकांच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीच्या नावे खाते उघडण्याची लवचिकताही आहे. गुंतवणुकीचा कालावधी 2 वर्षांचा असून, संपत्ती निर्माणासाठी हा एक समर्पित मार्ग सुनिश्चित करते.

खाते, उघडण्याच्या तारखेपासून 2 वर्षांनी ते परिपक्व होईल. ते आर्थिक नियोजनासाठी एक संरचित दृष्टीकोन प्रदान करेल. खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, दोन छायाचित्रे, मुलीचे जन्म प्रमाणपत्र (लागू असल्यास), पॅन कार्ड आणि पालकांच्या आधार कार्डच्या प्रती, ही आवश्यक कागदपत्रे आहेत.

दरसाल 7.5% इतका आकर्षक व्याजदर, त्रैमासिक आणि चक्रवाढ जमेसह, ही योजना आर्थिक वाढीसाठी एक आकर्षक संधी प्रदान करते. शिवाय, खाते उघडल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर शिल्लक रकमेच्या 40%पर्यंत रक्कम गुंतवणूकदार काढू शकतात, यामुळे आवश्यकतेनुसार काही प्रमाणात तरलता उपलब्ध होऊ शकते.

ही योजना वाजवी खात्याची मर्यादादेखील लागू करते, ज्यामुळे व्यक्तींना जास्तीतजास्त 2,00,000/- रुपयांच्या मर्यादेत कितीही खाती उघडता येतात. मात्र, विद्यमान आणि नवीन उघडल्या जाणाऱ्या खात्यांदरम्यान 3 महिन्यांचे अंतर अनिवार्य आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023साठी गुंतवणूकदारांना कोणतीही वयोमर्यादा नाही. यात सर्वसमावेशकतेवर भर दिला असून किमान 1000/- रुपयांच्या ठेवीसह गुंतवणुकीत लवचिकता प्रदान केली आहे.  

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023-24च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या या उपक्रमाचा उद्देश भारतातील महिलांमध्ये आर्थिक विवेकाची सवय वाढवणे हा आहे. 1 एप्रिल 2023पासून कार्यरत असलेली ही योजना 31 मार्च 2025 रोजी पूर्ण होणार आहे.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content