Homeटॉप स्टोरीआतिशी सिंग दिल्लीच्या...

आतिशी सिंग दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज आपल्या पदाचा राजीनामा देत असून दुपारी १२ वाजता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. जेमतेम चार महिन्यांकरीता असणाऱ्या मुख्यमंत्रीपदी कैलाश गहलोत यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. त्यांची निवड झाल्यास हरयाणा विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या काँग्रेसच्या मनसुब्यावर पाणी पडू शकणार होते. मात्र, बऱ्याच विचारानंतर तसेच चर्चेनंतर मावळते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मर्लेना सिंग यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेते म्हणून केजरीवाल यांनीच आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने पारित झाल्याचे समजते.

सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सोडल्यानंतर बाहेर आलेले अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांत आपण मुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज त्यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली असून यामध्ये नवीन नेता निवडला जाणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी आज दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची संध्याकाळी साडेचार वाजता भेटीची वेळ घेतली असून त्यावेळी ते आपल्या पदाचा राजीनामा सोपवतील आणि त्याचवेळी आपल्या उत्तराधिकाऱ्याचे पत्र त्यांना सोपवतील.

दिल्लीत येत्या फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारीमध्येच आचारसंहिता लागू शकेल. त्यामुळे या तीन महिन्यांत धडाकेबाज निर्णय घेणारी व्यक्ती आपला उत्तराधिकारी असेल असा प्रयत्न केजरीवाल करतील. सध्या हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचा

केजरीवाल

प्रचार शिगेला पोहोचला आहे. यामध्ये आम आदमी पार्टी पक्षाने स्वतःला झोकून दिले आहे. केजरीवाल यांनी या निवडणुकीत काँग्रेसबरोबर कोणताही समझोता केलेला नाही. याउलट दिल्ली, पंजाबनंतर हरियाणामध्ये तुम्ही आम आदमी पार्टीला एक संधी द्यावी, असे आवाहन ते करत आहेत.

पक्षाचे नेते राघव छड्डा आणि केजरीवाल्यांच्या पत्नी सुनीता यांनीही प्रचारात सतःला झोकून दिले आहे. सुनिता केजरीवाल तर आपण हरियाणाच्या सुन्षा असून हिस्सार हे आपले सासर असल्याचे जाहीर सभेमध्ये सांगत आहेत. हरियाणामध्ये गेल्या दहा वर्षांपासून भारतीय जनता पार्टीची सत्ता असून ही सत्ता उलथवण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्नात आहे. ऑलम्पिकमध्ये 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे बाद ठरलेली विनेश फोगट ही खेळाडूसुद्धा हरियाणाचीच असून तिच्या स्वागतासाठी हरियाणा काँग्रेसचे नेते भूपींदर हुडा पोहोचले होते. तेव्हापासून प्रत्येक बारीकसारीक मुद्दा काँग्रेस या निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा स्थितीत आम आदमी पार्टीकडून केला जाणारा प्रयत्न काँग्रेसच्या विजयाच्या आड येऊ शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात केली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने आपले उमेदवार उभे केले होते. परंतु त्यांच्यापैकी एकही उमेदवार निवडून आला नाही. किंबहुना आम आदमी पार्टीला साडेचार टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत.

त्याआधी आज होणाऱ्या आजच्या विधानसभा सदस्यांच्या बैठकीत भावी मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री केजरीवाल स्वतः प्रत्येक आमदारांशी यावर बोलले. सध्याच्या वातावरणात हरियाणातल्या निवडणुकांवर प्रभाव टाकू शकणारे कैलाश गहलोत, अतिशी सिंग, गोपाल राय, सौरभ भारद्वाज यांची नावे चर्चेत होती. गोपाल राय यांची उत्तर प्रदेशमधल्या पूर्वांचलवर जास्त पकड आहे. अतिशी सिंग या केजरीवाल यांच्या सरकारमध्ये अत्यंत प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या मंत्री आहेत. त्यांच्याकडे तब्बल बारा खात्यांचा कारभार आहे. केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया असे अनेक नेते गजाआड गेल्यानंतर त्यांच्या मंत्रालयाचा कारभार अतिशी यांनीच सांभाळला आहे. पक्षाच्या संघटनेवरही त्यांची बऱ्यापैकी पकड आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content