मुंबई शहर जिल्हा ज्युनियरआणि २३ वर्षांखालील वार्षिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यांच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य पदक मिळवले.
२० वर्षांखालील गटात ईशान मेंडिसने १०० मीटर धावणे आणि २०० मीटर धावणे शर्यतीत अनुक्रमे सुवर्ण, रौप्य पदकाची कमाई केली. १८ वर्षांखालील गटात मुलींमध्ये सारा राणेने सुवर्ण तर आर्यन सवणेने कांस्य पदक मिळवले. १६ वर्षांखालील गटात सूरज सरोजने आणि १४ वर्षांखालील गटात कृष्णाली सुर्वेने भालाफेकमध्ये सुवर्ण पदकाचा मान मिळवला. १४ वर्षांखालील गटात शौर्य पडवळने ट्रायथलॉनमध्ये रौप्य पदक पटकावले.
लांब उडीत उत्कृष्ट कामगिरीसाठी सारा राणे हिला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. पदक विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक सुनील सवने यांचे मार्गदर्शन लाभले.
मस्त!अभिनंदन!