Homeचिट चॅटअसि. पोस्टमास्तर वंदना...

असि. पोस्टमास्तर वंदना पै निवृत्त

असिस्टंट पोस्टमास्तर वंदना पै या उत्तम लेखिका, कवयित्री आहेत. त्यांनी आपल्या ३८ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता त्यांनी आपल्या कुटुंबाला योग्य तो वेळ द्यावाच, त्याचबरोबर वंदनाताईंनी आपल्यामधील कवी, लेखक जागृत ठेवताठेवता नवसाहित्याची निर्मिती करावी आणि पोस्ट कर्मचारी/ अधिकारी यांच्याबरोबरच समाजाचेही प्रबोधन करावे, असे प्रतिपादन शब्दांत ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी केला.

वंदना पै यांनी केंद्र सरकारच्या पोस्ट खात्यातून नुकतीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. याबद्दल त्यांचा बोरीवली पूर्व पोस्ट कार्यालयात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्रिवेदी बोलत होते.

वंदना पै यांनी त्यांच्या कारकिर्दीत बोरिवली पूर्व विभागात अनेक शिबिरांचे आयोजन करून जनतेसाठी उपयोगी असणाऱ्या अनेक बचत योजना सर्वसाधारण जनतेच्या दारापर्यंत पोहोचविल्या. यात खास मुलींसाठी असणारी सुकन्या योजना, सगळ्यात जास्त व्याजदर असणारी पीपीएफ योजना, पंतप्रधान जीवनसुरक्षा योजना तसेच अनेक आधार कॅम्प यांचा समावेश होता. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पेन्शनधारकांना घरपोच पेन्शन नेऊन देण्याची व्यवस्था केली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या ऑफिसला अनेकदा उत्कृष्ट कार्याबद्दल पारितोषिके मिळवून दिली, असा माहितीपूर्ण गौरवही त्यांनी केला.

त्यांच्या गौरव समारंभास टपाल कामगार युनियनचे या विभागाचे माजी सेक्रेटरी सी. ए. राजपूत, युनियनचे राष्ट्रीय स्तरावरील नेते विजय आयरे, कामगार नेते दिलीप कुडतरकर आणि आसपासच्या अनेक टपाल कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान या ऑफिसमधील असिस्टंट पोस्टमास्तर प्रिया कारकल यांनी भूषविले. वंदना पै यांनी धाडसी, साहसी महिला अधिकारी म्हणून आपला दबदबा निर्माण करतानाच अखिल भारतीय पातळीवर संघटनेतही मोठमोठाली पदे भूषविली. विजय वैद्य यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याची आठवण करुन दिली.

या गौरव समारंभात मीनल मोरे, संगीता रावराणे, धूपकर, रामदास चोडणकर, सखाराम तळेकर, प्रभाकर घोरपडे, सुनील पांगे, दिलीप चिंदरकर, बी. जी. चव्हाण, महेंद्र गणाचार्य, कुंडलिक काकडे, सूर्यकांत कदम, सुखदेव लोखंडे, वसंत घडशी आदींनी वंदना पै यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचे परिवारजनसुद्धा यावेळी आवर्जून उपस्थित होते.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content