Homeबॅक पेजगोव्यात शुक्रवारपासून रंगणार...

गोव्यात शुक्रवारपासून रंगणार आशियाई अजिंक्यपद अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स

१४वी अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धा येत्या ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात रंगणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आयोजनाखाली होणार असून या स्पर्धेत आशियातील अग्रगण्य जिम्नॅस्ट आपली कौशल्ये, नियंत्रण आणि कलात्मकता दाखवणार आहेत. स्पर्धैत १९ देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी मुंबईतल्या चेंबूर येथील नारायण आचार्य विद्यालयातील १९ खेळाडू भारतीय संघात निवडले गेले आहेत. भारतीय संघात जागतिक खेळांचे विजेते ऋतुजा जगदाळे, अर्णा पाटील, आचल गुरव यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पदकविजेते आकाश गोसावी, आदित्य खसासेही भारताचं प्रतिनिधित्व करतील. अलीकडे उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत

सर्व सुवर्णपदके जिंकणारे सान्वी शिंदे, आदित्य दिघे या स्पर्धेत भारतासाठी चांगली कामगिरी करतील, अशी आशा आहे. गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे.

अनुभवी प्रशिक्षक राहुल ससाणे संघाच्या तयारीबाबत म्हणाले की, आपले खेळाडू शिस्त, निष्ठा आणि मेहनतीने प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्येकाला देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं महत्त्व समजलं आहे. ते आपली सर्वोत्तम कामगिरी करतील. भारतीय अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स तांत्रिक समितीचे प्रमुख सुमित एम. के. म्हणाले की, आमच्याकडे अनुभवी आणि तरुण खेळाडूंचे संतुलित मिश्रण आहे. गोव्यात ही स्पर्धा आयोजित केल्यामुळे भारतातील अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्सचा दर्जा आणखी उंचावेल. आंतरराष्ट्रीय ज्युरी योगेश पवार यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत भारतीय खेळाडूंनी तांत्रिक अचूकता आणि कलात्मक सादरीकरणात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धात्मक दर्जा नव्हे, तर भारतीय अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्सची वाढती ताकददेखील दाखवेल.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content