Homeपब्लिक फिगरछगन भुजबळ, वडेट्टीवारकडून...

छगन भुजबळ, वडेट्टीवारकडून ओबीसींचे वाटोळे?

लोणावळ्याच्या चिंतन बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी ओबीसीसाठी आरक्षण पुनर्स्थापित करण्याचा ठराव घेण्यात आला. परंतु ओबीसी मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांचा निर्णय चुकीच्या दिशेने जात आहे. ओबीसी समाजाचे वाटोळे होईल असेच निर्णय या चिंतन शिबिरामध्ये घेण्यात आले, असा दावा ओबीसी नेते, माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.

या राजकीय चिंतन शिबिरामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाचे तीन सदस्य हजर होते, हे निंदनीय आहे. कारण या चिंतन बैठकीत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, असा ठराव मंजूर करण्यात आला . आपल्या देशात एस. सी./एस. टी. आणि ओबीसी असे तीनच प्रवर्ग आहेत. असे असताना मराठा समाजाला कुठून आरक्षण देणार? असा प्रश्न उपस्थित होतो. एकीकडे छगन भुजबळ मराठा समाजाच्या आरक्षणास आमचा विरोध नाही, असे म्हणतात आणि दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या विरोध करीत आहे हेच सिद्ध होते, असेही राठोड म्हणाले.

प्राध्यापक आणि सहप्राध्यापक यांच्याकरिता केंद्र सरकारने रोष्टरच्या बाबतीत कायदा केला असून तो एकल पदांना न लावता तो संवर्गनिहाय लावण्याचा कायदा राज्यात मंजूर करावा, अन्यथा १०० वर्षे ओबीसी आणि भटके-विमुक्त यांचे बिंदू नामावली येणार नाही. राज्यात ३०६४ प्राध्यापकांची भरती होणार असल्याचे असे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे, परंतु जोपर्यंत रोष्टर पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत भरती करण्यात येऊ नये.

सोमवारी, २८ जूनला राज्य सरकारने सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल केली असून केंद्राकडून २०११च्या जनगणनेचा एम्पॅरिकल डाटा मागणे चुकीचे आहे. राज्य सरकारने आपल्याला मिळालेला अधिकार न वापरता केंद्राकडे हा विषय ढकलणे ही अक्षम्य चूक आहे, असे ते म्हणाले.

छगन भुजबळ

ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा ठराव लोणावळा येथील शिबिरात घेण्यात आला, याचा अर्थ असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ओबीसींच्या बाजूने असताना आणि एम्पिरिकल डाटा गोळा करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळाला असताना केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे असून ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाचा बुद्धिभेद करण्याचा हा डाव आहे, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारकडे असा कुठलाही डाटा उपलब्ध नाही. असे असताना केंद्राकडे डाटा मागणे ही अक्षम्य चूक आहे. याचा अर्थ ओबीसीचेच नेते ओबीसी आणि भटक्या विमुक्तांची जनगणना करण्याचे टाळत आहेत. या चिंतन शिबिरामध्ये थोर विचारवंत हरी नरके यांनी समाजाचा बुद्धिभेद तर केलाच, परंतु सरकारलाही चुकीची माहिती ते देत आहेत. त्यांचा बोलावता धनी कोणीतरी दुसराच आहे, हे सिद्ध होत आहे, असेही हरीभाऊ राठोड यांनी सांगितले.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content