पिंग पाँग एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या ‘पिंग पाँग’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘हिडन’ या नव्या भव्य हिंदी वेबसिरीजच्या ट्रेलरचे दिमाखात प्रदर्शन करण्यात आले. उद्या म्हणजेच १६ जुलैपासून ‘हिडन’ ही मेगा वेबसिरीज ‘पिंग पाँग’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. प्रतीक्षा, कुतूहल, उत्सुकता शमवित आज ‘हिडन’मधील कलाकार, तंत्रज्ञांच्या यांसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील आलिशान ‘द क्लब’ येथे ‘हिडन’च्या ट्रेलरचे बहारदार प्रदर्शन करण्यात आले. ‘गहन रहस्यांची उत्कंठा अधिक गहन’ करणाऱ्या या ट्रेलरबद्दल कमालीचे कुतूहल तयार झाले आहे.
‘हिडन’ ही ७ भागांची आणि ३ सीझन असलेली मेगा वेब सीरिज आहे. ‘हिडन’ ही काल्पनिक कथा आहे. या वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहिल्यानंतरच यातील रहस्य नेमकं काय आहे याचा प्रेक्षकांना उलगडा होणार आहे. ही एक डार्कशेड असलेली मुंबई शहरातील गोष्ट आहे. हिडनमधील सर्व व्यक्तिरेखा काल्पनिक असून गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी आहे. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील वेगवान घटना प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील. पोलिस, गुन्हे, ड्रग्ज, खून, रहस्य यांचे वेगवान चित्र हिडनमध्ये पाहायला मिळणार आहे.
एका रात्री प्रदीप राजे (एसीपी क्राइम ब्रँच) यांना त्यांचा विश्वासू खबरी (हलका) मध्यरात्री अडीचच्या सुमारास तुरूंगात एकाचा खून होणार आहे, अशी माहिती देतो. एसीपी राजे ही गोष्ट गांभीर्याने घेतात. आयुक्त यशवंत नाईक यांना याबाबत पूर्वकल्पना देतात. समय दीक्षित या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अज्ञात मारेकऱ्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्याला वाचविण्यासाठी राजे आपल्या तीन विश्वासू अधिकाऱ्यांसोबत (संदीप, प्रभाकर आणि उमर) योजना आखतात.
पोलिस आयुक्त (यशवंत नाईक), यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याने पोलिस अधिकारी राजे वैयक्तिकरित्या या बाबीकडे लक्ष देतात. धक्कादायक बाब म्हणजे समय तुरूंगात आहे आणि “मारेकरी” म्हणून जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. त्याचा जिवलग मित्र मनन शाह याच्या हत्येचा त्याच्यावर आरोप येतो. समय खरोखर गुन्हेगार आहे कि निर्दोष? त्याला राजे वाचवू शकणार का? त्याच्या भूतकाळात असे काय घडले? नेमकं वास्तव काय आहे? अनेक ‘हिडन’ गोष्टींची उकल होण्यासाठी हिडन पाहावीच लागेल..

महाराष्ट्रातील प्रसिद्ध उदयोजक जीवन जाधव यांनी हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म खास जगभरातील भारतीय प्रेक्षकांसाठी लाँच केला आहे. या ओटीटीवर अत्यंत वेगळ्या आणि आकर्षक नव्या वेबसिरीज, वेब मुव्हीज, बॉलिवूड, हॉलिवूड मुव्हीज तसेच इतर एंटरटेन्मेन्ट शोज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
‘हिडन’बाबत बोलताना या वाहिनीचे सर्वेसवा सीएमडी जीवन जाधव म्हणाले की, भाषेला, भावनांना आणि विषयांना मर्यादा नसतात आणि म्हणूनच ‘पिंगपाँग एंटरटेनमेंट’ ओटीटी ऍप चालू करायचं, ते जास्तीतजास्त भाषांमधून जास्तीतजास्त कन्टेन्ट घेऊन लोकांपर्यंत पोहोचावं ह्या हेतूने आम्ही उपलब्ध करून दिला आहे. उत्तम संहिता, कलाकार, तंत्रज्ञ घेऊन सतत नवनवीन कन्टेन्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू आणि त्याला फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगातून प्रेक्षक पसंती मिळेल असा माझा पूर्ण विश्वास आहे.
HIDDEN ह्या बिग बजेट वेबसिरीसचे ७ भाग १६ जुलैपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही ह्या ७ एपिसोडचं शूट अवघ्या १५ दिवसांत केलं आहे आणि तेही कोरोना काळात.. ही कलाकृती प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल अशी मला खात्री आहे.
‘पिंग पाँग’चे चॅनेल हेड चेतन डीके म्हणाले की, आजच्या जीवनात जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे रोटी, कपडा, मकान और मोबाईल.. आज जगात बहुतांश लोकांकडे स्मार्ट फोन आहेत आणि त्यातूनच आपण लोकांना उत्तमोत्तम कन्टेन्ट देऊ शकतो ह्या भावनेने आम्ही ‘पिंग पाँग एंटरटेनमेंट’ची सुरुवात केली. ज्यावेळी HIDDEN हा कन्सेप्ट माझ्यासमोर आला त्यावेळी आम्ही त्याला ताबडतोब फायनल केला कारण त्याची उत्तम कथा, पटकथा आणि संवाद..
‘हिडन’मध्ये नेमकं काय ‘हिडन’ आहे याविषयी लेखक-दिग्दर्शक विशाल सावंत म्हणाले की, हिडनबाबत सर्वच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. हिडनमध्ये काय हिडन आहे याविषयीचर्चा सुरु होईल. त्यांच्या साऱ्या प्रश्नांची उकल होण्यासाठी प्रेक्षकांनी या वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहणं गरजेचं आहे. मुंबई शहरातील डार्कशेड हिडनमध्ये दिसेल. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील वेगवान घटना प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील.
विशाल पी. सलेचा आणि महेश पटेल यांनी ‘हिडन’ची निर्मिती केली असून विशाल सावंत यांनी या वेबसिरीजचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. कमल सिंग यांचे छायांकन असून रसीद खान यांनी संगीत दिग्दर्शन केलेआहे. ‘हिडन’मध्ये संतोष जुवेकर, संजय सोनू, दक्ष सिंग, जीत सिंग, मनवीर चौधरी, रजत वर्मा, रोहित परशुराम आणि संदीप पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
ओरिजनल मनोरंजनाचा अमर्याद आनंद मिळविण्यासाठी आपल्याला ‘गुगलप्ले स्टोअर’ किंवा ‘ॲपस्टोअरवर’ जाऊन ‘पिंग पाँग’ हे ॲप डाऊनलोड करावे लागेल किंवा https://pingpongentertainment.com या वेबसाईटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करणे खूपच सोपे आहे.
हिंदी वेबसीरीज “HIDDEN” च्या ट्रेलरची लिंक-
वेबसाइट: https://pingpongentertainment.com/
प्लेस्टोर: https://play.google.com/store/apps/details?id=com.pingpongenteriversity.ott
युट्युब : https://youtu.be/Sgrok9FSi38
फेसबुक: https://www.facebook.com/pingpong.ott
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/pingpongenteriversity/