Homeएनसर्कलनागपुरात दिव्यांगांसाठी अनुभूती...

नागपुरात दिव्यांगांसाठी अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क! 

देशातील सर्वात सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधांनी युक्त असा दिव्यांग पार्क नागपूर शहरात होत असून याचा फायदा नागपुरातील दिव्यांगाना होणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी पूर्व नागपुरातील सूर्य नगर येथे दिव्यांगांसाठी अनुभुती इन्क्लुझिव्ह पार्कच्या लोकार्पण समारंभाप्रसंगी काल व्यक्त केला.

पूर्व नागपूरच्या सूर्य नगर, लता मंगेशकर गार्डन, पारडी येथे दिव्यांगाकरिता अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्कचा लोकार्पण सोहळा गडकरींच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी आणि पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यावेळी उपस्थित होते.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे तत्कालीन जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांच्या निरीक्षणाखाली दिव्यांग पार्क उभारला गेला. याच पार्कच्या धर्तीवर असाच एक पार्क नागपुरात व्हावा अशी आमची इच्छा होती. नागपुरातील या दिव्यांग पार्कसाठी संकेत भोंडवे यांचे सहकार्य लाभले असून या पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, डॉ. पंकज मारू, रितेश यादव आणि संजय कुलकर्णी यांचे यात विशेष योगदान लाभलेले आहेत. सर्वांना लक्षात राहील असा पार्क नागपूर इथे उभारला गेला असून या पार्कमध्ये गुणवत्तेचे काम व्हावे अशी अपेक्षा आहे, असे गडकरी म्हणाले.

दिव्यांगाच्या अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्कमध्ये फिजिओथेरपी इमारत, हायड्रोथेरपी रूम, क्लासरूम, वॉटर इक्विटी झोन, किचन कॅन्टीन, दृष्टीहीन लोकांसाठी स्पर्शिकामार्ग, श्रवणदोष असलेल्यांसाठी सांकेतिक भाषा निर्देशक आणि ब्रेल लिपीमधील नामांकन व चिन्ह यांचा समावेश आहे. तसेच नक्षत्रवाटिका, झायलोफोन आणि पक्षांच्या आवाजातील संगीत थेरपी, ब्रेल बुद्धिबळ, दिव्यांगांसाठी रबर फ्लोरिंगवर खेळांची उपकरणे आणि ओपन जिम अशा विविध सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून जिल्हा विकास नियोजन समितीमधून आर्थिक तरतूद करून दिव्यांगाना या पार्कपर्यंत येण्याजाण्याची सोय व्हावी म्हणून इलेक्ट्रिक बस देण्यावरसुद्धा चर्चा झालेली आहे. दिव्यांगांसाठी उभारलेला अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क देशातला आदर्श असा एक पार्क असून या पार्कचे नियोजन आणि व्यवस्थापन विशेष टीम स्थापन करून येथील सुविधेची परिणामकारक अंमलबजावणी होईल यासाठी प्रयत्न करावे, असेही गडकरींनी सांगितले.

भविष्यात या दिव्यांगाच्या पार्कसाठी अनेक नवनवीन आधुनिक उपकरणे पुरवण्यावर आपला भर राहणार आहे. दिव्यांगासाठी उभारलेले अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क हे दिव्यांगाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम करेल तसेच दिव्यांगासाठी नागपुरात सर्वात मोठे स्पोर्ट्स स्टेडियम उभारले जाणार असल्याचे गडकरींनी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांना मुख्य धारेत आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दिव्यांगासाठी विविध आधुनिक उपकरणे आणि आरोग्य सेवा पुरवीत आहे. राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये दिव्यांगासाठी आरक्षणाचीसुद्धा तरतूद केलेली आहे. लहान मुलांतील कर्णबधिरता आटोक्यात आणण्यासाठी कॉक्लिअर इम्प्लांटची सुविधा नागपुरात उपलब्ध झालेली आहे. अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क येथे दिव्यांगांसाठी विविध थेरपी आणि प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content