Homeटॉप स्टोरीपूरग्रस्त विद्यार्थांना जेईई...

पूरग्रस्त विद्यार्थांना जेईई मेन परीक्षेची पुन्हा संधी!

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे जे विद्यार्थी आज, 25 आणि 27 जुलै रोजी होणारी जेईई परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांना ही परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जाईल, अशी घोषणा राष्ट्रीय चाचणी यंत्रणा- एनटीए ने केली आहे. नव्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील.

कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, सांगली आणि सातारा या सात शहरांमध्ये  ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे आहेत, आणि जे विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसाठी 25 आणि 27 जुलै रोजी पावसामुळे केंद्रांवर जाऊ शकत नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना आणखी एकदा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल.

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, सांगली आणि सातारा या सात शहरांमध्ये ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे आहेत आणि जे  विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसाठी या केंद्रांवर जाऊ शकत नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची सूचना एनटीए- म्हणजेच राष्ट्रीय चाचणी यंत्रणेला दिली आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल ट्विटरवरुन दिली.

या शहरांमध्ये ज्यांची परीक्षा केंद्रे आहेत, असे विद्यार्थी सद्य परिस्थितीत कदाचित उद्या म्हणजेच 25 आणि 27 जुलैला होणाऱ्या परीक्षांसाठी जाऊ शकणार नाहीत, मात्र म्हणून त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यांना परीक्षेसाठी पुन्हा एक संधी दिली जाईल आणि या पर्यायी तारखा एनटीए लवकरच जाहीर करेल, असे प्रधान यांनी म्हटले आहे.

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या सत्रातील परीक्षा  देशभरात, 20, 22, 25 आणि 27 जुलै रोजी नियोजित केल्या आहेत.  देशातल्या आणि परदेशातील 334 शहरांमध्ये या परीक्षा होत आहेत. एनटीए ने याआधी 20 आणि 22 जुलै रोजी दोन परीक्षा घेतल्या आहेत. या सर्व परीक्षार्थींना एनटीएच्या (www.nta.ac.in) संकेतस्थळाकडे (jeemain.nta.nic.in) लक्ष देत राहावे, त्यावर त्यांना परीक्षेविषयीची ताजी माहिती मिळू शकेल, असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.

सविस्तर माहिती आणि स्पष्टीकरणासाठी JEE (Main) – 2021चे परीक्षार्थी 011-40759000 या क्रमांकावर अथवा jeemain@nta.ac.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content