Homeचिट चॅट‘एंजेल ब्रोकिंग’ व...

‘एंजेल ब्रोकिंग’ व ‘मॅक्स बुपा’ झाले अनुक्रमे ‘एंजेल वन’ व ‘निवो बुपा’!

‘एंजेल ब्रोकिंग’, या फिनटेक प्लॅटफॉर्मने ‘एंजेल वन’ ही नवी ओळख जाहीर केली आहे. ग्राहकांच्या स्टॉकब्रोकिंग सेवांसह सर्व वित्तीय गरजा पुरवण्यासाठीचा हा ‘डिजिटल फर्स्ट ब्रँड आहे. नवीन अवतारात, या एकछत्री ब्रँडअंतर्गत वर्तमानातील आणि भविष्यातील सर्व बिझनेस युनिटचा समावेश असेल.

या अनावरणाविषयी बोलताना एंजेल ब्रोकिंग लि.चे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी म्हणाले की, एंजेल वनला आघाडीची फिनटेक कंपनी बनवण्याचे तसेच नव्या काळातील जेनझेड आणि मिलेनिअल भारतीय गुंतवणूकदारांसमोर स्वत:ला समकालीन, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त अवतारात सादर करणे आमचे उद्दिष्ट आहे.

एंजेल वन, हा एक नावीन्यपूर्ण आणि सशक्त प्लॅटफॉर्म असून तो टिअर २ आणि ३ शहरांसह सहजपणे जनरेशन-झेड आणि मिलेनिअल्सला प्रतिसाद देतो. कंपनीच्या ब्रँडचा वारसा, ध्येयधोरणांचे मिश्रण म्हणजे हे परिवर्तन आहे. कंपनी ब्रोकिंग हाऊसकडून ‘वन-सोल्युशन’ प्लॅटफॉर्मपर्यंत प्रत्येक वित्तीय गरजांसाठी प्रवास करत असून यात म्युच्युअल फंड्सपासून विमा, कर्ज आणि इतर सेवांचाही समावेश आहे.

कॉर्पोरेट कंपनीचे नाव एंजेल ब्रोकिंग लिमिटेड राहिल. मात्र, ग्राहकांसमोर जाणारे मास्टरब्रँड आता ‘एंजेल वन’ म्हणून ओळखले जाईल. हे बदल एंजेल ब्रोकिंगचे सर्व प्लॅटफॉर्म, टचपॉइंट्स, एक्सटर्नल आणि इंटरनल याठिकाणी दिसून येतील. डिजिटल फर्स्ट ब्रँड होण्याचे ध्येय गाठण्यासाठी, कंपनीचे वेब आणि अॅपवरील प्लॅटफॉर्म सतत अपडेट केले जात आहेत.

एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे सीईओ नारायण गंगाधर म्हणाले की, आमच्या तंत्रज्ञान आधारीत प्लॅटफॉर्मसह डिजिटल परिवर्तनानंतर आम्ही उत्पन्नात वृद्धी अनुभवली. आम्ही आमची सखोल तंत्रज्ञान कौशल्ये वापरून अधिक उत्पादने आणि सेवा तयार करत आहोत, जेणेकरून आमच्या ग्राहकांच्या सुविधांची व्याप्ती वाढेल. आमच्या ग्राहकांशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी, आम्ही स्वत:ला ‘एंजेल वन’ म्हणून सादर करत आहोत.

भूतकाळातील यशस्वी परिवर्तनावर आधारीत नव्या ध्येयाबाबत एंजेल ब्रोकिंगला आत्मविश्वास आहे. भारतातील ९८% पिनकोड म्हणजेच १८,८७४ ठिकाणांहून ५ दशलक्षांपेक्षा ग्राहकवर्ग कंपनीशी जोडलेला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने तिमाहीतील सर्वाधिक ४,७४५ दशलक्ष रुपयांचा एकूण महसूल नोंदवला.

मॅक्स बुपाच्या नाममुद्रेतही बदल

खाजगी आरोग्य विमा कंपनी ‘मॅक्स बुपा’ हेल्थ इन्शुरन्सही आता ‘निवा बुपा’ हेल्थ इन्शुरन्स या नावाने ओळखला जाणार आहे.

मॅक्स इंडियाने या विमा कंपनीत 51 टक्के भागभांडवल ठेवले आणि 510 कोटी रुपयांच्या करारात फेब्रुवारी 2019मध्ये आपला हिस्सा विकला. यापूर्वीच्या प्रवर्तकांनी कंपनी सोडली होती. परंतु, दोन वर्षांच्या कालावधीत मॅक्स ब्रँडचा वापर टप्प्याटप्प्याने केला जाईल आणि त्याऐवजी योग्य जागी बदलले जातील. तथापि, बुपा ब्रँड नाव पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

मॅक्स बुपाचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णन रामचंद्रन यांनी निवेदनात म्हटले आहे की, मॅक्स इंडियाच्या बाहेर पडताना आणि खासगी इक्विटी प्रवेशामुळे भागधारक पद्धती बदलली. अशाप्रकारे हा बदल पाहता मॅक्स बुपाला नवीन ब्रँड ओळख निर्माण करण्याची आवश्यकता भासली.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content