मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप विविध वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये अनाहिता महाजन, स्वरा लड्डा, थिया वागळे, मैत्रेयी बेरा यांनी तर मुलांमध्ये इवान दुबे, आर्श मिश्रा, नैतिक पालकर, अरहान खान यांनी विजेतेपद पटकाविले.
आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना सहकार्यीत स्पर्धेत ६ वर्षांखालील मुलींमध्ये अनाहिता महाजनने (५ गुण) प्रथम, चैतन्या नागराळेने (४ गुण) द्वितीय, वियोना जैनने (३ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये इवान दुबेने (४ गुण) प्रथम, अबीर अग्रवालने (४ गुण) द्वितीय, अधवान ओसवालने (४ गुण) तृतीय पुरस्कार जिंकला.
८ वर्षांखालील मुलींमध्ये स्वरा लड्डाने (४ गुण) प्रथम, मीरा शेट्टीने (३ गुण) द्वितीय, आद्या भटने (२ गुण) तृतीय तर मुलांमध्ये आर्श मिश्राने (५ गुण) प्रथम, अधरित दुबेने (४ गुण) द्वितीय, आहन मिश्राने (३ गुण) तृतीय; १० वर्षांखालील मुलींमध्ये थिया वागळेने (५ गुण) प्रथम, मृणमयी डावरेने (३ गुण) द्वितीय,
सिम्रिता बुबनाने (२.५ गुण) तृतीय तर मुलांमध्ये नैतिक पालकरने (४ गुण) प्रथम, नील भटने (४ गुण) द्वितीय, अगस्त्य भामरेने (३ गुण) तृतीय आणि १२ वर्षांखालील मुलींमध्ये मैत्रेयी बेराने (४.५ गुण) प्रथम, आराध्या सिंगने (३ गुण) द्वितीय, साईशा मुळेने (३ गुण) तृतीय तर मुलांमध्ये अरहान खानने (४.५ गुण) प्रथम, कृषीव सुरेकाने (४ गुण) द्वितीय, संकीत संघवीने (३.५ गुण) तृतीय क्रमांक पटकाविला.
बँक ऑफ बडोदाचे असिस्टंट जनरल मॅनेजर घनश्याम दास यांच्या हस्ते विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सहसचिव पी. बी. भिलारे, क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी उपस्थित होते. या स्पर्धेत १२२ खेळाडूंमध्ये चुरस होती. स्विस लीग पद्धतीने ही स्पर्धा काल खेळविण्यात आली.
६ ते १४ वर्षांखालील ८ वयोगटांतील पहिल्या १० मुलांना व पहिल्या ५ मुलींना बीओबी कपचा पुरस्कार देण्यात आला. सर्व सामने जिंकणाऱ्या लहान वयोगटातील विजेत्यास क्रीडाप्रेमी सुरेश आचरेकर स्मृती विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संयोजकांतर्फे बुद्धिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात आले.