Homeकल्चर +आशियाई स्पर्धेत अमृता...

आशियाई स्पर्धेत अमृता भगत ठरली ‘बेस्ट लिफ्टर’!

दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक आफ्रिकन क्लासिक आणि इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडची पॉवरलिफ्टर अमृता भगत ठरली “बेस्ट लिफ्टर”. अमृता शेलू वांगणीची रहिवासी असून तिने 47 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

या स्पर्धेत अमृता भगत हिने जूनियर इक्विप गटातल्या स्कॉट प्रकारात 122.5 किलो वजन, बेंच प्रेस प्रकारात 67.5 किलो वजन, आणि डेडलिफ्ट प्रकारात 132.5 किलो वजन उचलले. तिने एकूण 322.5 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर “एशियन बेस्ट लिफ्टर” हा किताबसुद्धा प्राप्त केला. अमृता भगतची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आणि तिने पदकांची परंपरा कायम राखली.

अमृता भगत हिला खोपोलीमधील विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शन असून ती अतिशय खडतर मेहनत घेते. रायगडच्या महिला खेळाडूला पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत किताब मिळाला आहे. याबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी राज्य खेळाडू गिरीश वेदक, माजी राष्ट्रीय खेळाडू माधव पंडित आणि सचिव अरुण पाटकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे खास अभिनंदन केले असून येणाऱ्या भावी काळासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच तिचा असोसिएशनतर्फे खास गौरव करण्यात येणार आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content