Homeबॅक पेजएअर मार्शल रानडे...

एअर मार्शल रानडे हवाई दलाच्या निरीक्षण तसेच सुरक्षा विभागाचे नवे महासंचालक!

एअर मार्शल मकरंद रानडे यांची काल, 1 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील हवाई दल मुख्यालयात निरीक्षण तसेच सुरक्षा विभागाच्या महासंचालकपदी [डीजी (आय अँड एस)] नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय तसेच फ्रान्सचे कॉलेज इंटरआर्मी द डिफेन्स या शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या एअर मार्शल मकरंद रानडे यांनी 6 डिसेंबर 1986पासून भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विभागातून सेवेला सुरुवात केली. एकूण 36 वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत एअर मार्शल मकरंद रानडे यांनी अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये तसेच पदांवर काम केले. लढाऊ विमानांच्या तुकडीचे तसेच दोन हवाई स्थानकांचे कमांड म्हणून केलेल्या कार्याचा समावेश आहे.

रणनीती तसेच हवाई लढा प्रशिक्षण विकास संस्था आणि संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. काबुल तसेच अफगाणिस्तानच्या भारतीय दूतावासांमध्ये त्यांनी एअर अट्टॅचे म्हणून कर्तव्य निभावले आहे. हवाई दलाच्या मुख्यालयात नेमणूक झालेली असताना त्यांनी  संचालक, कार्मिक अधिकारी, हवाई दल कर्मचारी निरीक्षण संचालनालयाचे मुख्य संचालक आणि हवाई दल कार्यकारी (अवकाश) विभागाचे सहाय्यक प्रमुख या पदांवर काम केले आहे. आताच्या नियुक्तीपूर्वी ते नवी दिल्ली येथील पश्चिम एअर कमांडच्या मुख्यालयात वरिष्ठ कर्मचारी अधिकारीपदावर कार्यरत होते.

एअर मार्शल मकरंद रानडे यांना वर्ष 2006 मध्ये वायू सेना (शौर्य) पदक तसेच वर्ष 2020 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले होते. एअर मार्शल संजीव कपूर हे हवाई दलात 38 वर्षांचा प्रतिष्ठित सेवेचा कार्यकाळ पूर्ण करून 30 नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

Continue reading

‘तिसऱ्या मुंबई’ची दावोसमध्ये मुहूर्तमेढ! रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा!!

मुंबई, नवी मुंबईपाठोपाठ आता रायगड-पेण परिसरात 'तिसरी मुंबई' आकारात येत आहे. स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्या मुंबईतले पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. आज प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य...

‘वंदे भारत’च्या स्लीपर ट्रेनला उदंड प्रतिसाद, हातोहात तिकिटे बूक!

वंदे भारत स्लीपर ट्रेन (गाडी क्रमांक 27576)च्या कामाख्या (केवायक्यू) आणि हावडा (एचडब्ल्यूएच)दरम्यानच्या पहिल्या व्यावसायिक फेरीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पीआरएस आणि इतर साईट्सद्वारे तिकीट आरक्षण सुरू झाल्यानंतर काही तासांतच गाडीतल्या सर्व जागा आरक्षित झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

विनोद तावडे भाजपाचे केरळचे निवडणूक प्रभारी!

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांची केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काल सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच नितीन नबीन यांनी ही घोषणा केली. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे केरळमध्ये...
Skip to content