12 ते 14 जानेवारीदरम्यान मुंबईत होणार हवाई कसरती!

भारतीय हवाई दल, महाराष्ट्र सरकारच्या समन्वयाने, भारतीय हवाई दलाच्या जनसंपर्क कार्यक्रमा अंतर्गत मुंबईत 12 ते 14 जानेवारी 24 या कालावधीत दुपारी 12 ते 1 या वेळेत मरीन ड्राइव्हवर हवाई कसरतींचे आयोजन करणार आहे.

जागरूकता निर्माण करणे आणि भारतीय हवाई दल तसेच स्थानिक समुदाय यांच्यात सखोल संबंध वाढवणे हा या जनसंपर्क कार्यक्रमाचा उद्देश आहे. चित्तवेधक कसरती आणि प्रात्यक्षिके, भारतीय हवाई दलाचे कौशल्य, क्षमता आणि व्यावसायिकतेचे दर्शन घडवतील.

या कार्यक्रमात सूर्यकिरण हवाई प्रात्यक्षिक पथक (एस. के. ए. टी.) आणि ‘सारंग’ हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथकाद्वारे हवाई प्रात्यक्षिकांचा समावेश असेल. फ्लायपास्ट आणि सुखोई-30 एमकेआय. द्वारे कमी उंचीवरील हवाई कसरती, ‘आकाशगंगा’ पथक आणि सी-130 विमानाद्वारे फ्रीफॉल आणि पॅराशूट प्रात्यक्षिकांसह विविध प्रकारच्या हवाई कसरतींचा समावेश असेल.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content