Homeटॉप स्टोरीआरोग्य भरती परीक्षांपाठोपाठ...

आरोग्य भरती परीक्षांपाठोपाठ टीईटीच्या तारखेचाही गोंधळ!

आरोग्य विभागातील पदांच्या भरती परीक्षांच्यावेळी गोंधळ झाला असतानाच, आता शिक्षक भरती परीक्षेच्या (टीईटी) तारखा ठरविण्यातही गोंधळ झाला आहे. टीईटीची परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी जाहीर केली असतानाच, त्याचदिवशी एनईटी (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) होणार आहे. त्याचा फटका राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना बसणार आहे.

या प्रकाराकडे कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले असून, परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. कोरोना आपत्तीच्या काळानंतर राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) घोळ सुरू आहे. यापूर्वी या परीक्षेचे वेळापत्रक तीन वेळा बदलण्यात आले.

टीईटी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याचदिवशी यूपीएससीची परीक्षा होती. त्यामुळे ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा जाहीर करण्यात आली. त्याचदिवशी आरोग्य विभागाने भरतीसाठी परीक्षा घेतली. त्यामुळे परीक्षेची तारीख ३० ऑक्टोबर करण्यात आली होती. परंतु, नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे पुन्हा तारीख बदलून २१ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. मात्र, ही तारीख ठरविताना, केंद्रीय स्तरावरून होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (एनईटी) वेळापत्रक लक्षात घेण्यात आले नाही. एनईटी परीक्षेला २० ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून, ती ५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबर रोजी एनईटीची परीक्षा देणाऱ्या तरुण-तरुणींना टीईटी परीक्षेला मुकावे लागणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या नियोजनशून्य व बेफिकीर कारभारामुळे शेकडो विद्यार्थ्यांना टीईटी वा एनईटी यापैकी एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. या प्रकाराबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी टीका केली असून युपीएससी, एमपीएससी आणि परीक्षा मंडळांबरोबर समन्वय साधून टीईटीची परीक्षेची तारीख निश्चित करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content