Homeएनसर्कलतब्बल १३२ वर्षांनंतर...

तब्बल १३२ वर्षांनंतर लष्कराचे गाईंचे गोठे बंद!

ब्रिटीशांच्या काळापासून देशभरात असलेले लष्कराचे १३० गोठे तब्बल १३२ वर्षांनंतर बंद करण्याचा निर्णय लष्कराने घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.

विविध ठिकाणी तैनात असलेल्या सैन्याच्या जवानांना ताजे आणि शुद्ध दूध मिळावे, यासाठी लष्कराने देशभर स्वतःच्या मालकीचे गाई-गुरांचे गोठे स्थापन केले होते. अलाहाबाद येथे १ फेब्रुवारी १८८९ रोजी पहिला गोठा सुरू करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर लष्कराने देशभरात १३० गोठे स्थापन केले होते, ज्यात ३०,००० जनावरे होती. १९९० साली लेह आणि लद्दाख येथेही असे गोठे तयार करण्यात आले होते, जेणेकरून जवानांना त्यांच्या लष्करी तळांवर दररोज स्वच्छ आणि ताजे दूध मिळू शकेल.

या गोठ्यांच्या व्यवस्थापनासह, लष्करातील कर्मचाऱ्यांना आपल्या जमिनीच्या मोठमोठ्या पट्ट्यांची देखभाल करुन तिथल्या गवताच्या पेंढ्याचीही व्यवस्था बघण्याचे आणि या पेंढ्या गोठे सांभाळणाऱ्या विभागांकडे पाठवण्याचेही काम होते.

जवळपास एक शतकभर, लष्कराच्या या गोठ्यांतून दरवर्षी ३.५ कोटी लिटर दूध आणि २५००० मेट्रिक टन पेंढ्याचा पुरवठा सातत्याने सुरू होता. तसेच या गोठ्यांमध्येच भारतात पहिल्यांदा जनावरांचे कृत्रिम रेतन करण्याचा यशस्वी प्रयोग झाला. कृषी मंत्रालयाशी समन्वय साधत, या विभागाने, ‘प्रोजेक्ट फ्रेजवाल’ हा दुभत्या जनावरांचा जगातील सर्वात मोठा मिश्र संकराचा कार्यक्रमदेखील राबवला होता. तसेच डीआरडीओच्या जैव-इंधन बनवण्याच्या प्रकल्पातदेखील या विभागाने मदत केली होती.

१९७१च्या युद्धात, कारगिल युद्धाच्या वेळी पूर्व आणि पश्चिम सीमेवर लढणाऱ्या जवानांना याच गोठ्यांमधून ताज्या दुधाचा पुरवठा केला गेला. तब्बल १३२ वर्षे देशाची अखंडित अविरत सेवा केल्यानंतर आता या विभागाची सेवा समाप्त होत आहे. या विभागात काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लष्कराच्या इतर विभागांमध्ये समायोजित करण्यात आले आहे.

Continue reading

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे यश

प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ठाणे आणि...

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...
Skip to content