Homeएनसर्कलबेंगळुरूमध्ये आजपासून ‘एअरो...

बेंगळुरूमध्ये आजपासून ‘एअरो इंडिया’!

बेंगळुरू येथील येलहंका हवाईदल तळावर आजपासून एअरो इंडिया 2023चा द्वैवार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या 17 फेब्रुवारी 23 या कालावधीत हा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम संरक्षण क्षेत्र उद्योगांना त्यांची अद्ययावत उपकरणे, हेलिकॉप्टर आणि विमाने प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देईल. संरक्षण दलातील कर्मचार्‍यांना मूळ उपकरणे उत्पादक (ओईएम) प्रतिनिधींशी संवाद साधण्याची आणि भविष्यात सशस्त्र दलात समाविष्ट करण्यासाठी विचाराधीन उत्पादनांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधीदेखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या देशाच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, भारतीय नौदलाने अलीकडेच, हलके लढाऊ विमान (नौदल), स्वदेशी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक विमान (ट्विन इंजिन डेक बेस्ड फायटर) स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर उतरवले आहे. या विमानाचे उड्डाण भारतीय नौदलाच्या चाचणीसाठी नियुक्त वैमानिकाने केले होते. ही विशिष्ट क्षमता भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भर भारताच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचे फलित आहे.

एअरो इंडिया 2023 दरम्यान, भारतीय नौदल अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे. या  कार्यक्रमादरम्यान एएलएच एमके III आणि एमआर विमान पी8आय ही स्वदेशी विमाने, अनुक्रमे हवाई कसरती आणि स्टॅटिक डिस्प्लेमध्ये सहभागी होतील. भारतीय नौदलाने संरक्षण उत्पादन विभागाच्या सहकार्याने ‘हवाई शस्त्रास्त्र  देखभालीमध्ये आत्मनिर्भरता’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. हे चर्चासत्र सरकारच्या उपक्रमांवर आणि सशस्त्र दलातील क्षेपणास्त्रांच्या देखभालीसाठी आणि पुढील वाटचालीवर तपशीलवार चर्चा करण्याच्या अनुषंगाने, संरक्षण मंत्रालय, वापरकर्ते, देखभाल करणारे गुणवत्ता हमी संस्था, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि भारतीय उद्योगातील प्रमुख भागधारकांना व्यासपीठ प्रदान करतील.

शिक्षण आणि उद्योगांसोबत निरंतर प्रतिबद्धता हे भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या प्रयत्नांचे केंद्रस्थान आहे. या दिशेने विविध शैक्षणिक संस्था आणि प्रमुख उद्योग भागीदार यांच्यात माहिती आणि संसाधने सामायिक करण्यासाठी सामंजस्य करार केले जातात. एरो इंडिया 2023 दरम्यान, दोन प्रमुख भागीदार म्हणजेच इस्रो आणि मेसर्स एव्ही ऑईल यांच्यात ‘बंधन’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून सामंजस्य कराराच्या माध्यमातून जोडले जात आहे.

वर्षानुवर्षे व्याप्ती आणि भव्यता  वाढल्याने, नौदल हवाई विभागाचा विकास आणि सक्षमीकरण तसेच राष्ट्राच्या संरक्षण दलांच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एअरो इंडिया आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content