Homeटॉप स्टोरी‘लवासा’प्रकरणी आदित्य ठाकरेंनी...

‘लवासा’प्रकरणी आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी!

‘लवासा’प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने, ही राष्ट्रीय संपत्तीची लूट असून यामध्ये पवार कुटुंबियांचा सक्रिय सहभाग असल्याबाबत गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याची भूमिका स्पट करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार आज एका पत्रकार परिषदेत केली.

काही दिवसांपूर्वी लावासा प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला व निष्कर्ष स्पष्ट केले आणि निरिक्षणे नोंदवली. हा निकाल, निष्कर्ष आणि निरिक्षणे राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी वाचली असतील अशी अपेक्षा आहे. न्यायालय म्हणते की लवासामध्ये राजकीय मनमानी आहे, सत्तेचा दुरूपयोग आहे, प्रशासकीय हलगर्जीपणा आहे, पवार कुटुंबियांचा सक्रिय सहभाग आहे, तसेच राष्ट्रीय संपत्तीची लूट आहे. या कामात पारदर्शकतेचा अभाव आहे, व्यक्तीगत स्वारस्य आहे, कर्तव्य निभावताना हलगर्जीपणा आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत, असे ते म्हणाले.

ठाकरे

लवासा ही संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आहे. व्यक्तीगत स्वारस्य खासदार सुप्रिया सुळे यांचे आहे तर कर्तव्य निभावताना परवानग्यांमध्ये निष्काळजीपणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचे विषय अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे या विषयाकडे सरकारचे लक्ष आहे का, या विषयाशी संबंधित असलेले मंत्री आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांशी थेट आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा. देव, देश आणि धर्मासाठी आता बोलून नाही तर करून दाखवा, असे जाहीर आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दबावासमोर झुकू नये. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मर्जीतील पोलीस आयुक्त नियुक्त केले आहेत. त्यामुळे थेट पोलीस आयुक्तांना आदेश द्यावेत आणि दाऊद हस्तक आणि त्यांचा राजकीय वरदहस्त असलेल्या नवाब मलिक यांच्यासारख्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही शेलार यांनी केली.

सरकारची भूमिका आणि प्रथमिकता कोणती?

राज्यातील आघाडी सरकारची प्रथमिकता कोणती आणि न्यायीक भूमिका कोणती हे कळायला मार्ग नाही. मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तर त्यांचा राजीनामा घेण्यात आला तर त्यापेक्षा भयंकर आरोप नवाब मलिक यांच्यावर झाले, पण त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. आझाद मैदानात आमचे छत्रपती संभाजीराजे उपोषणाला बसले त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडेपर्यंत सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्यासाठी टाहो फोडायला सगळे मंत्रीमंडळ एकवटले. हे ठाकरे सरकार आडनावे बघून भूमिका घेते का? काही विशिष्ट समाजातील विशिष्ट आडनावाच्या माणसांची विशेष काळजी सरकार घेते का?, असा सवालही आशिष शेलार यांनी केला.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content