Sunday, April 27, 2025
Homeकल्चर +'शातिर..'मधून अभिनेत्री रेश्मा...

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटातून अभिनेत्री रेश्मा वायकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे.

‘शातिर THE BEGINNING’, या चित्रपटाची कथा- सुनील वायकर आणि हेमंत एदलाबादकर यांची आहे तर पटकथा आणि दिग्दर्शन सुनील वायकर यांनी केले Eus. त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली रेश्मा वायकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले असून गीतकर वैभव देशमुख यांच्या गीतांना वैशाली सामंत, शाल्मली खोलगडे यांचा स्वरसाज आहे.

पदार्पणातील भूमिकेबद्दल बोलताना रेश्मा वायकर म्हणाल्या की, पहिला चित्रपट करताना काहीतरी हटके भूमिका असायला पाहिजे हे मी ठरवले होते. आज आपल्या समाजात अंमली पदार्थ सहजतेने मिळत आहेत. ते घेणाऱ्या तरुणाईचे प्रमाण वाढत आहे. विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर अशाच प्रकरणामुळे मधल्या काळात चर्चेत होते. या दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध लढा देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईची ही कथा आहे. अॅक्शनपॅक्ड अशा नायिका, एक सामाजिक संदेश देणारी व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. 

या चित्रपटात रेश्मा वायकर यांच्यासह मीर सरवर, योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर, अभिमन्यू वायकर, वेद भालशंकर, श्रेया कुलकर्णी, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी ‘शातिर THE BEGINNING’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Continue reading

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही....

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण...
Skip to content