Homeबॅक पेजबीएलएसईद्वारे अॅडिफिडेलिस सोल्‍यूशन्‍सचे...

बीएलएसईद्वारे अॅडिफिडेलिस सोल्‍यूशन्‍सचे अधिग्रहण

बीएलएस ई-सर्विसेस लिमिटेड (बीएलएसई)ने भारतातील कॉर्पोरेट्स व व्‍यक्‍तींसाठी कर्जवितरण व प्रक्रियेमधील सर्वात मोठी कंपनी अॅडिफिडेलिस सोल्‍यूशन्‍स प्रा. लि. आणि‍ तिच्‍या सहयोगी कंपन्यांमधील (एएसपीएल) ५५ टक्‍के नियंत्रित हिस्‍सा संपादित करण्‍यासाठी नुकतेच शेअर परचेस अॅग्रीमेंट (एसपीए)वर स्‍वाक्षरी केली आहे. याचे एंटरप्राइज मूल्‍य जवळपास १९० कोटी रूपये आहे. बीएलएसई अंदाजे ७१ कोटी रूपयांची (प्राथमिक व दुय्यम) आगाऊ गुंतवणूक करेल आणि‍ उर्वरित गुंतवणूक आर्थिक वर्ष २०२५मध्‍ये उल्‍लेखनीय टप्‍पे संपादित करण्‍यासाठी करण्‍यात येईल. हे संपादन ऑल-कॅश डिल असेल. आर्थिक वर्ष २०२५च्‍या दुसऱ्या तिमाहीमध्‍ये हा व्‍यवहार पूर्ण होईल.

बीएलएस ई-सर्विसेस लि.चे अध्‍यक्ष शिखर अग्रवाल म्‍हणाले की, आम्‍हाला एएसपीएलसोबत निर्णायक करारावर स्‍वाक्षरी करण्‍याची घोषणा करताना आनंद होत आहे. या धोरणात्‍मक पुढाकारामुळे अनेक क्रॉस-सेलिंग संधी निर्माण होतील तसेच आमच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये विशेषीकृत कर्जप्रक्रिया व वितरण सेवांची भर होईल. यासह आमचे लास्‍ट-माइल बँकिंग सेवा वितरित करण्‍यामधील अग्रणी स्‍थान अधिक दृढ होईल.

आमच्‍या १,००,०००हून अधिक टचपॉइण्‍ट्सवर दररोज ६ लाखांहून अधिक व्‍यक्‍ती येत असल्‍यामुळे आम्‍ही आमच्‍या टचपॉइण्‍ट्सचे लोकेशन कोणतेही असो भारतातील तळागाळामधील सुरक्षित व असुरक्षित कर्जांचा शोध घेणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी व्‍यापक संदर्भासह एएसपीएलला सुसज्‍ज करण्‍यास स्थित आहोत. एएसपीएलचे प्रतिष्ठित संबंध आणि‍ बहुतांश आर्थिक संस्‍थांसोबत पॅनेलमधील समावेश आमच्‍या २१,०००हून अधिक बिझनेस करस्‍पॉण्‍डंट सेंटर्सचे नेटवर्क अधिक दृढ करतील.

हब-अॅण्‍ड-स्‍पोक मॉडेलच्‍या माध्‍यमातून कार्यरत असण्‍यासोबत भारतातील १७ राज्‍ये व केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वसमावेशक उपस्थितीसह एएसपीएलचे ८,६००हून अधिक चॅनेल सहयोगींचे नेटवर्क कर्ज चौकशीची सुविधा देतात, जे बीएलएलईच्‍या बिझनेस करस्‍पॉण्‍डंट्स-नेतृत्वित नागरिक-केंद्रित लास्‍ट माइल बँकिंग सेवांच्‍या पोर्टफोलिओशी संलग्‍न असेल. 

एएसपीएल सध्‍या आपल्‍या चॅनेल सहयोगींच्‍या व्‍यापक नेटवर्कच्‍या माध्‍यमातून सरासरी मासिक १,५०० कोटी रूपयांहून अधिक कर्जवितरण करते आणि आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्‍स व टाटा कॅपिटल अशा आघाडीच्या आर्थिक संस्‍थांसोबत सूचीबद्ध आहे. आर्थिक वर्ष २०२४साठी लेखापरिक्षित न केलेल्‍या आर्थिक निकालांनुसार एएसपीएल आणि‍ तिच्‍या सहयोगींनी जवळपास ५७७ कोटी रूपयांचा महसूल संपादित केला तसेच ईबीआयटीडीए जवळपास २२ कोटी रूपये राहिला. 

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content