Homeब्लॅक अँड व्हाईटराष्ट्रीयीकृत बँकांच्या संघाला...

राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघाला तब्बल २८९ कोटींना गंडा! आरोपी अटकेत!!

विविध बँकांच्या संघाशी संबंधित 289.15 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान सीबीआयने मेसर्स तिरूपती इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जगमोहन गर्ग यांना नुकतीच अटक केली. त्यांना 13 जुलै 2023 पर्यन्त पोलिस कोठडी देण्यात आली आहे. बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि युको बँक अशा राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघाची सुमारे 289.15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्लीतील एका खाजगी कंपनीविरुद्ध तसेच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, संचालक, हमीदार, तसेच इतर काही सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती आणि खाजगी व्यक्तींविरोधात 25 मे 2022 रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील या बँक संघाने, कर्जदार कंपनीला, 2009 ते 2014 या कालावधीत, नवी दिल्लीत पश्चिम विहार इथे एक हॉटेल आणि इतर व्यावसायिक गाळे  बांधण्यासाठी 300 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. मात्र, या आरोपीने, कर्जदात्या बँक संघाला काहीही कल्पना न देता, ह्या कथित हॉटेल आणि व्यावसायिक जागांची अनेक व्यावसायिक/किरकोळ विक्रेते/कार्यालये यांना परस्पर विक्री केली, असा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच या खरेदीदारांकडून मिळालेले पैसे अन्यत्र वळवण्यात आल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी आधी 27.05.2022 रोजी आरोपीशी संबंधित विविध ठिकाणी घालण्यात आलेल्या छाप्यादरम्यान, अशा गैरव्यवहारांशी संबंधित कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. तपासादरम्यान, सीबीआय ने अनेक साक्षीदार, बँकांचे अधिकारी, कर्जदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे.अधिक माहितीसाठी, कृपया CBI वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या AC-V, CBI, दिल्लीच्या FIR/RC 2232022A0003 दिनांक 25.05.2022 मध्ये अधिक तपशील पहावेत.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content