बिग बॉस मराठीच्या घरामधून काल एक सदस्य घराबाहेर पडला तर एका नवा सदस्याची एंट्री झाली. काल अक्षय वाघमारेला घराबाहेर पडावं लागलं. बिग बॉसमध्ये काल झाली सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री. आदिश वैद्यचा काल धम्माकेदार performance झाला. आज आदिश घरामध्ये जाणार आहे. पण, त्याआधीच बिग बॉस त्याला एक कठीण असे कार्य सोपवणार आहे.

बिग बॉस आदिशला बहुमूल्य temptation स्वीकारण्याची सुवर्णसंधी देणार आहे आणि ते temptation आहे पॉवर कार्ड. या पॉवरद्वारे घरातील कोणता सदस्य कोणते काम करणार याची विभागणी करण्याचा अधिकार आदिशकडे असणार आहे. त्यामुळे दिवसभरातील कारभारावर आदिशचं वर्चस्व असेल. पण आता हे temptation स्वीकारल्यास या पॉवर कार्डची किंमत घरातील सदस्यांना मोजावी लागणार आहे.

आदिश पॉवर कार्डचा स्वीकार करणार आहे. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे. म्हणजे त्याचा खेळ घरात जाण्याअगोदरच सुरू होणार आहे. पॉवर कार्ड मिळविण्याची संधी त्याने स्वीकारलीही आहे. पण त्याच्या बदल्यात घरातील कोणत्याही तीन सदस्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. ती म्हणजे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे. आदिशने कुठल्या तीन सदस्यांची यासाठी निवड केली ते आज कळेलच. पण त्यावरून स्नेहा वाघ त्याला टोमणे मारताना दिसणार आहे.

स्नेहा आदिशला म्हणते, “आल्या आल्या त्रास दिला तुम्ही सगळ्यांना. जसं की आमची तीन लोकं जखमी केली. त्यावर आदिश म्हणतो “कुठले तरी तीन होणारच होते. जर तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असतं? स्नेहा म्हणाली “माझी पद्धत वेगळी असती. मी वेगळ्या पद्धतीने डील केलं असतं. म्हणजे माझ्या पद्धतीने मी डील केलं असतं. नॉट नेसेसरी की आपल्या कोणत्या गोष्टीने समोरच्याला त्रास झालाच पाहिजे, त्याचा त्रास कमी करूनही गोष्टी करू शकतो.

आदिश म्हणतो, “ त्यादृष्टीने मी पूर्ण प्रयत्न केला आहे”. बघूया पुढे अजून काय काय घडतं? कोणकोणत्या गोष्टी खटकतात? तेव्हा बघा बिग बॉस मराठी, आज रात्री, कलर्स मराठीवर..

