Homeब्लॅक अँड व्हाईटमंत्र्यांच्या निर्देशानंतर बोट...

मंत्र्यांच्या निर्देशानंतर बोट नसलेल्या व्यक्तीचे बनले आधार कार्ड!

केरळमधील एका व्यक्तीला बोटे नसल्याच्या कारणास्तव आधार नोंदणी करता आली नाही हे कळताच, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तिची नावनोंदणी करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले. याच अनुषंगाने, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)च्या चमूने त्याचदिवशी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कुमारकम येथे जोसिमोल पी जोस यांच्या घरी भेट दिली आणि त्यांचा आधार क्रमांक तयार करून घेतला. आजपर्यंत, आधार प्राधिकरणाने बोटे नसलेल्या किंवा अन्य कारणांमुळे बोटे किंवा बुबुळ किंवा दोन्ही बायोमेट्रिक्स प्रदान करण्यात अक्षम असलेल्या सुमारे 29 लाख व्यक्तींना आधार क्रमांक जारी केले आहेत.

अधिकार्‍यांनी केलेले सहकार्य आणि मदतीबद्दल त्यांच्या आईने आभार मानले आणि आधारच्या मदतीने त्यांची मुलगी आता सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतन तसेच कैवल्य या दिव्यांगांसाठीच्या पुनर्वसन योजनेसह विविध फायदे आणि सेवांचा लाभ घेऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

वर उल्लेख केल्याप्रमाणे, अपवादात्मक नावनोंदणी अंतर्गत आधार प्राधिकरण–युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) दररोज सुमारे एक हजार व्यक्तींची आधार नोंदणी करते. जोसिमोलिन यांना आधी नावनोंदणी केल्यावर आधार क्रमांक का जारी केला गेला नाही, याची कारणे आधार प्राधिकरणाने तपासली तेव्हा, आधार नोंदणी ऑपरेटरने अपवादात्मक नावनोंदणी प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे असे घडल्याचे लक्षात आले.

या अनुषंगाने आधार प्राधिकरणाने नावनोंदणी निबंधक आणि संस्थांना सर्व आवश्यक पावले उचलण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. त्यात, प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती, जागरूकता आणि संवेदनशीलतेचा प्रसार करणे, सर्व आधार नोंदणी ऑपरेटरना अपवादात्मक नावनोंदणी प्रक्रियेची जाणीव करून दिली गेली आहे याची खात्री करणे, त्याचप्रमाणे त्या प्रक्रीयेचे अनुसरण करणे, अशा प्रकारची नावनोंदणी आवश्यक असलेल्या व्यक्तींना योग्य ते सहाय्य करणे याबाबत सल्ला देण्यात आला आहे. शिवाय, या संदर्भात एक माहितीपर पोस्टर तयार करून ते आधार नोंदणी केंद्रांच्या दर्शनी भागांत लावण्यात आले आहे.

Continue reading

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...
Skip to content