Homeब्लॅक अँड व्हाईटसोलापूरमध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय...

सोलापूरमध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्यावर डिजिटल प्रदर्शन

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमानिमित्त दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये आणि केंद्र शासनाचे 9 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर तामलवाडी टोल प्लाजा येथे तीन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन चोवीस तास सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्त्वाखाली भारताने माघील ९ वर्षांत विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे आणि धोरणांची माहिती सह भारतीय भरडधान्याचा इतिहास, ऐतिहासिक नावे, विविध दुर्मिळ प्रजाती आणि आरोग्यासाठी होणारे फायदे या विषयीची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. सोबत गरीब वंचित, आदिवासी, महिला, युवा, शेतकरी, उद्योजक यांच्या विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय, उज्वला गॅस योजना, डिजिटल इंडिया, पंतप्रधान पीक विमा योजना, किसान सन्मान योजना, आवास योजना, पीएम श्री योजना या सारख्या कल्याणकारी योजनांची माहिती डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना पाहता येणार आहे.

केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या सोलापूर येथील, केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने व जिल्हा व पोलिस प्रशासन शासनाच्या सहकार्याने तामलवाडी टोल प्लाजा येथे ३ दिवसांकरिता मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन भरविणयात येत आहे.

कोजागिरी पोर्णिमा निमित तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरिता पायी चालत येणाऱ्या महाराष्ट्र कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यातील भाविकांना पौष्टिक भरडधान्ये आणि केंद्र शासनाने माघील ९ वर्षात घेतलेले निर्णय, धोरणे आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय संचार ब्युरो, सोलापूरचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी दिले आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content