Homeडेली पल्सतस्करीची अभिनव पद्धत...

तस्करीची अभिनव पद्धत उघडकीस!

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय ) कुरिअर मार्गाने भारतात अंमली पदार्थ (कोकेन) ची तस्करी करण्याच्या एका नव्या पद्धतीचा छडा लावला आहे, ज्यामध्ये कोकेन थर्मोकोल बॉल्समध्ये जाणूनबुजून लपवले होते. डीआरआयला मिळालेल्या विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे, नवी दिल्लीतील न्यू कुरिअर टर्मिनल येथे डीआरआय अधिकाऱ्यांनी आयात वस्तूची कुरिअर खेप रोखून त्याची तपासणी केली, यावेळी 1922 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले, ज्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य अंदाजे 26.5 कोटी रुपये आहे.

ही कुरिअरची खेप ब्राझीलच्या साओ पाउलो येथून दोन खोक्यांमधून  आली होती आणि त्यात “टेबल सेंटर (सजावटीची वस्तू)” असल्याचे घोषित करण्यात आले होते . मालाच्या प्रथमदर्शनी तपासणीत असे आढळले  की दोन खोक्यांमध्ये प्रत्येकी एक काचेचा क्रिस्टल बाऊल होता  तसेच सुमारे दोन सेंटीमीटर व्यासाचे हजारो थर्माकोल बॉल होते, जेणेकरून काचेच्या वस्तूंचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये.

थर्मोकोल बॉल्सचे बारकाईने निरीक्षण केल्यावर असे दिसून आले की काही गोळे बाकीच्या गोळ्यांपेक्षा थोडे जड (फक्त 1-2 ग्रॅम) होते. त्यानुसार, वजनाप्रमाणे  जड थर्माकोल बॉल वेगळे करण्यात आले , जे एकूण थर्माकोल बॉल्सच्या सुमारे 10% होते. हे जड थर्माकोलचे 972  गोळे कापले असता , त्यात पारदर्शक आणि अगदी  पातळ पॉलिथिनने झाकलेले पांढऱ्या भुकटीचे छोटे गोळे लपवून ठेवलेले आढळले.

या पांढऱ्या रंगाच्या भुकटीच्या चाचणीत  कोकेन असल्याचे आढळले. परिणामी, एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत एकूण 1922 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content