Homeकल्चर +आजपर्यंत 1857 ते...

आजपर्यंत 1857 ते 1947 कालखंडाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे मल्टिमीडिया प्रदर्शन!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता कार्यक्रम, मेरी माटी मेरा देश आणि विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमित माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर आणि मध्य रेल्वे, सोलापूर विभाग यांच्या वतीने दिनांक १४ ते १६ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडीवर आणि स्वातंत्र्यसंग्रामातील महत्वपूर्ण घटनांवर तीन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन सोलापूर रेल्वे स्टेशनमधील जनरल तिकीट खिडकीच्या जवळील जागेत करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शनमध्ये १८५७ ते १९४७ पर्यतच्या स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती, सोलापुरातील चार हुतात्मे आणि भारत-पाक फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांचे दुर्मिळ छायाचित्रे व मजकूर सहित माहिती असणार आहे. डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक स्थळे आणि दुर्मिळ दृश्ये बघता येणार आहे. या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान सोबत एक सेल्फी याचे विशेष आकर्षण असणार आहे.

प्रदर्शन

प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूरचे खासदार मा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे, जिल्हाधिकारी, रेल्वे विभागीतील वरिष्ठ अधिकारी आदि उपस्थित राहणार आहेत हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ०९ वाजे पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे.

भारतीय स्वातंत्र्यालढ्याबद्दल रेल्वे प्रवासी आणि सामान्य नागरिकांना माहिती व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक्, स्पर्धा परिक्षाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय संचार ब्युरो, सोलापूर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधीकारी अंबादास यादव यांनी केले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content