Homeएनसर्कलतटरक्षक दलाचे धाडसी...

तटरक्षक दलाचे धाडसी बचावकार्य, 36 जणांना वाचवले!

भारतीय तटरक्षक दलाने धाडसी बचाव कार्यात असाधारण कार्यक्षमता आणि जलद प्रतिसाद दाखवला, ज्यामुळे 36 जणांचे प्राण वाचले आणि संभाव्य पर्यावरणीय आपत्ती टाळली.

सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (सीएसआयआर-एनआयओ) ‘सिंधु साधना’ हे संशोधन जहाज कारवारच्या दिशेने जात असताना संकटात सापडले होते. जहाजाचे इंजिन पूर्णपणे निकामी झाले होते, त्यामुळे ते गतिहीन होते आणि समुद्राच्या प्रवाहावर ते चालत होते. 26 जुलै रोजी दुपारी एक वाजता गोव्यातील तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालयात यासंबंधीचा संदेश प्राप्त झाला.

‘सिंधु साधना’ बहुमोल वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज आणि महत्त्वपूर्ण संशोधन माहिती घेऊन जात असल्याने परिस्थिती गंभीर होती. शिवाय, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील कारवार किनाऱ्यापासून हे जहाज जवळ असल्याने तेलगळतीचा धोका होण्याची शक्यता होती, ज्यामुळे सागरी पर्यावरणाचीही हानी झाली असती.

संकटाच्या आवाहनाला त्वरित प्रतिसाद देत भारतीय तटरक्षक दलाने आयसीजीएस सुजित आणि आयसीजीएस वराह या दोन अत्याधुनिक जहाजांवर कुशल पथकांसह सर्वोच्च प्राधान्याने बचाव मोहीम सुरू केली. आपत्तीची संभाव्य तीव्रता ओळखून भारतीय तटरक्षक दलाने जहाजाचे रक्षण, सागरी परिसंस्थेचे रक्षण आणि जहाज मध्येच थांबून राहू नये यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या.

अतिशय प्रतिकूल हवामानात, समुद्रातील लाटा आणि 45 नॉटीकल मैलापर्यंत वारे वाहत असतानाही भारतीय तटरक्षक दलाने संकटात सापडलेल्या सीएसआयआर-एनआयओ जहाजाची बचाव मोहीम हाती घेतली. अशा आव्हानात्मक परिस्थितीत जहाज टोईंग करण्यासाठी प्रचंड कौशल्य आणि दृढ निश्चयाने आयसीजीएस सुजीतने ‘सिंधू साधना’ जहाजाला यशस्वीरित्या टोईंग केले. दोन्ही जहाजे सध्या गोव्याच्या दिशेने येत आहेत आणि 28 जुलै रोजी सकाळी 10 वाज्च्याया सुमारास मुरगाव बंदरावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. सीएसआयआर-एनआयओ संशोधन जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content