HomeArchiveजाणून घ्या भारतीय...

जाणून घ्या भारतीय नौकानयनाचा इतिहास!

Details
जाणून घ्या भारतीय नौकानयनाचा इतिहास!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
प्राचीन काळापासून भारत देश नौकानयनात पारंगत आहे. या क्षेत्रातील आपली प्रगती विस्मयचकित करणारी आहे. आपला गौरवशाली इतिहास सांगतो की भारतीय नागरिकांनी नौकानयनाच्या सहाय्याने अनेक देशांशी नाते जोडले होते. भारतीय नौकानयनाची ही गौरवशाली परंपरा व पुढे परकीयांनी तिचा जाणीवपूर्वक नाश करेपर्यंतचा समग्र व रोचक इतिहास , सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक व लेखक डॉ. द. रा. केतकर यांनी त्यांच्या ‘भारतीय नौकानयनाचा इतिहास’ या आगामी ग्रंथात अतिशय अभ्यासपूर्वक मांडला आहे.

देशात मोदी सरकार आल्यानंतर देशांतर्गत जलसेवेचा सहभाग वाढवून रस्त्यावरील ताण नि पेट्रोल डिझेल वरील खर्च कमी व्हावा म्हणून ‘सागरमाला योजना’ राबवली जात आहे. गंगा नदीच्या काही भागात हुबळीपर्यंत मार्ग चालू केला असून इतरही टप्प्यात आहेत. नितीन गडकरी यात लक्ष घालून होते. मुंबई गोवासह जलवाहतूक सुरू झालीय. डॉ. केतकरांच्या विवेचनानंतर याचं महत्त्व लक्षात येईल.

जनसेवा समिती, विलेपारले या आपल्या संस्थेमार्फत रविवार, दि. १४ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ठीक ५ वा, विलेपार्ले पूर्व येथील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात या संदर्भग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. “समुद्रावरील शिवाजी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजी आंग्रे यांचे विद्यमान वंशज, सरदार श्री रघुजीराजे आंग्रे आणि व्हाईस एडमिरल (निवृत्त) अभय कर्वे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुस्तक प्रकाशनानंतर या पुस्तकाचे लेखक डॉ. द. रा. केतकर, ‘भारतीय नौकानयनगाथा’ या विषयावर स्लाईड शो आणि व्याख्यान सादर करणार आहेत.

हा कालखंड सिंधुसंस्कृतीचा आहे, ज्या काळात नौकानयनाबरोबर जहाज बांधणी क्षेत्रातही आपला उत्कर्ष झाला होता. ज्या देशांशी सागरी मार्गाने आपला व्यापार हजारो वर्षे सुरू होता, त्यांच्याशी सांस्कृतिक देवाणघेवाणही आपण ठेवली होती. इ. स. पूर्व २०० ते इ. स. २०० या कालखंडात भारतीय जहाजांनी बंगालचा उपसागर पार करून जावा, सुमात्रा, बाली या प्रदेशात हिंदू राज्ये वसवली. या देशात आपली सांस्कृतिक मूल्ये रूजवण्यात आपण यशस्वी झालो. आपल्या नाविक कौशल्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार सर्वदूर होऊ शकला. यासाठीच भारताला ‘नौकानयना’चे उत्पत्तीस्थान मानले जाते.

प्राचीन कालखंड, मराठा साम्राज्य आणि मराठा साम्राज्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचा काळ अशा तीन विभागात, भारतीय नौकानयनाच्या संपूर्ण इतिहासाची अभ्यासपूर्ण आणि ससंदर्भ मांडणी या ग्रंथात केली आहे. नौकानयनाच्या इतिहासासोबत नाणी, शिल्पे, नौकानयनातील यंत्रे, नौका बांधणी तंत्र, नकाशे यांचा या पुस्तकात वापर करून एका परिपूर्ण संदर्भ ग्रंथाची निर्मिती लेखकांनी केली आहे.

जनसेवा समिती, विलेपार्ले आयोजित, या उत्तम आणि अभ्यासपूर्ण ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात आपण सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन लेखक प्रकाशक नि समितीने केले आहे. हा कार्यक्रम निःशुल्क आहे. सुट्टीचे दिवस असल्याने बच्चे कंपनीसाठी तो ज्ञानाचा ठरेल यात शंकाच नाही. या कार्यक्रमादरम्यान डॉ. द. रा. केतकर यांच्या ‘सरखेल कान्होजी आंग्रे’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचेही प्रकाशन होणार आहे. प्रकाशन सोहळ्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी सदरहू दोन्ही ग्रंथ सवलतीच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. भारतीय नौकानायनाचा इतिहास- मूळ किंमत ४००/- प्रकाशनाच्या दिवशी- ३००/-, सरखेल कान्होजी आंग्रे, तिसरी आवृत्ती- मूळ किंमत २५०/- प्रकाशनाच्या दिवशी- २००/-. पुस्तक प्रकाशक- मर्वेन टेक्नॉंलॉजीज मनोज केळकर. अधिक माहितीसाठी संपर्कः पराग लिमये (९९८७५ ६५७३८), डॉ. केतकर (९८२०१ ९५७७९, ९००४६५७६६३).”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content