HomeArchiveभारतीय हवाई दलाची...

भारतीय हवाई दलाची `गरूड’ भरारी!

Details
भारतीय हवाई दलाची `गरूड’ भरारी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
राफेलवरून माजलेले रण थंड होत असताना भारतीय हवाई दलाची एक तुकडी आपला सहावा एकत्रित सराव ‘गरूड’ करण्यासाठी फ्रांसला रवाना झाली. द्विपक्षीय सैन्य सरावासाठी १९९८ साली एक करार करण्यात आला होता. त्यानुसार हा आठवा भाग आहे. हिंदुस्थानच्या हवाई दलाची एक तुकडी आर्मी डी I’Air (फ्रान्सचे हवाई दल) सोबत एकत्र अभ्यास करण्यासाठी फ्रान्सला रवाना झाली आहे. दोन्ही हवाई दलाच्या संयुक्त अभ्यास करण्याचा या कार्यक्रमाला गरूड म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे संयुक्त अभ्यास करण्याचा ही सहावी वेळ आहे. याच महिन्यातच हा अभ्यास केला जाईल.

दोन्ही देशाच्या हवाई दलाने एकत्र अभ्यास करण्याच्या या कार्यक्रमाची सुरूवात 2003 मध्ये सुरू झाली. याचा पहिला अभ्यास हा हवाई दलाच्या ग्वालियर तळावर करण्यात आला होता. दोन्ही दलामध्ये कार्यपद्धती ताळमेळ नि अधिकची माहिती देवाणघेवाण होत असते. दोन्ही देशातील हवाई दलाच्या प्रशिक्षण पद्धतींची ओळख होणे आणि ती पद्धत कशाप्रकारे प्रत्यक्षात अंमलात आणण्यात येते हे जाणून घेणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. ज्यामुळे भविष्यात दोन्ही देशातील सहकार्य वाढवण्यात अधिक मदत मिळेल.

युद्ध परिस्थिती आणि अन्य विविध प्रकारच्या स्थितीत हवाई दल कशाप्रकारे महत्त्वाची भूमिका निभाऊ शकते यासाठीच्या विविध पद्धती एकत्रितरित्या अभ्यासल्या जातील. यंदा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हवाई दलाकडून 24 स्क्वाड्रनला (हॉक्स) पाठवले आहे, जे या अभ्यास शिबिरात सुखोई (Su-30 MKI) लढाऊ विमान ताफा संचलन करत आहे. गेल्या दशकात हवाई दलाने बहुराष्ट्रीय तसेच द्विपक्षीय अशा अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया यांच्या हवाई दलांसोबत संयुक्त कवायती केल्या आहेत.

मॉंटे डे मर्सिन या हवाई तळावर हा अभ्यास होणार असून यात एक आय एल 78, एअर टू एअर रिफ्युएलर आणि सी 17 ग्लोबमास्टरदेखील सामील होतील. यात मोठ्या पल्ल्याच्या हल्ल्यावेळी योग्य संचालन कसे करावे यावर जोर दिला जाईल. जमिनीवरील रडार आणि एअरबोर्न वॉर्निंग कंट्रोल सिस्टीम गतिमानतेने हाताळणे याचेही शिक्षण होणार आहे. विविध प्रकारच्या हल्ल्याची रचना नि ध्वस्त करणे यावर भर असेल. आपले हवाई दल अधिकारी अनेक उत्तम अभ्यास करून प्राविण्य मिळवत असतात. अशा मोहिमांमधून प्रथा, संचलन कार्यप्रणाली शिकता येते.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content