HomeArchiveसम्राट बेकरचे दुर्दैवी...

सम्राट बेकरचे दुर्दैवी फेरे..

Details
सम्राट बेकरचे दुर्दैवी फेरे..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
संपूर्ण टेनिस विश्वात मानाची समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेला सुरूवात झालीय. या क्रीडा प्रकारात जी महत्त्वाची विजेतेपदं मानली जातात त्यात या स्पर्धेचा समावेश आहे. अनेक दिग्गजांनी ही स्पर्धा गाजवलीच, आपली छापही त्यावर सोडली. अनेकांनी तर वर्षानुवर्षे आपले विजेतेपद टिकवून ठेवले होते. त्यात मार्टिना नावरातिलोव्हा, हिचं नाव अग्रभागी आहे. मार्टिना हिंगिस, विल्यम्स भगिनी ही अलीकडच्या काळातील नावं, पिट सांप्रस, जॉन मॅकेंरो, रॉजर फेडरर, जिमी कॉनर्स, बोरिस बेकर, आदी खेळाडूंची यात मक्तेदारी राहिली आहे.

अशाचपैकी कोणावर दिवाळखोरीमुळे लिलावाची पाळी आली आणि तीही ऐन स्पर्धा चालू असताना किती ही नामुष्की! पण हे दुर्दैव ओढवलंय बेकरवर! सर्वात तरूण विजेता म्हणून या चषकावर त्याने नाव कोरले. अवघ्या सतराव्या वर्षी तो विजेता बनला तो धक्कादायक निकाल लावतच. या विश्वात त्याने खळबळ माजवली. सहा वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेला हा खेळाडू वयाच्या ५१ व्या वर्षी, कधीकाळी कोट्यधीश असलेला हा बेकर २०१७ साली कंगाल घोषित झाला. त्याच्या जवळपास ८२ वस्तूंची विक्री ऑनलाइन होत आहे. ब्रिटिश कंपनी वेल्स हार्डीच्या संकेतस्थळावर. २४ जूनपासून लीलाव चालू आहे. तो ११ जुलैपर्यंत असेल. यात बोरीसच्या ट्रॉफी, घड्याळ, नाना प्रकाशचित्रे यांचा समावेश आहे. मात्र, इतकं करूनही संपूर्ण कर्ज चुकतं होईल असं जाणकारांना वाटत नाही. या लिलावातून किती रक्कम मिळेल याचा अंदाज कोणी लावलेला नाही.

तो जन्माने ब्रिटिश असला तरी खेळायचा मात्र प. जर्मनी कडून! सहा वेळचं ग्रँड स्लॅम विजेता ‘बूम बूम बेकर’ नावाने ओळखला जात होता. आपल्या खेळाडू कारकिर्दीत ४९ विजेतेपद जिंकणाऱ्या बेकरने दोन कोटी युरो (१५८ कोटी रूपये) खिशात घातले होते. या खेळाडूवर ५.४ कोटी पौंड (सुमारे ४७७ कोटी रूपये) इतकं कर्ज आहे. सध्या टेनिस स्पर्धांची समालोचने नि इतर उद्योग त्याचे सुरू आहेत. या लिलावात चॅलेंज कपची रेप्लिका जी त्याने विम्बल्डन जेतेपद घेतल्यावर मिळवली, रेनशॉ कपची रेप्लिका याचाही समावेश आहे. ही त्याने सर्वात कमी वयात ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्यामुळे मिळवली होती.

असे अनेक खेळाडू खेळात आपल्या ऐशोआरामी जिंदगीने पैसा सांभळता न आलेले अनेक आहेत. आसमंतात झेप असलेले खाली कोसळले हे नवीन नाही. अशांची मोठी यादी आहे. त्यात नाव आहे डिएगो मॅराडोना. या फुटबॉलपटूने आपल्या खेळाने जगावर मोहिनी घातली होती. वादग्रस्त असलेल्या या अर्जेंटिनाच्या खेळाडूला इटालियन सरकारने थकबाकीदार घोषित केले. ड्रग घेण्यासाठी हा बदनाम झाला. मुष्टियोद्धा माईक टायसन यानेही नावाबरोबरच अनेकदा विजेतेपद जिंकलं, पैसे उभा केला. बाहेर होणारे सततच्या वाद, हाणामाऱ्यामुळे अनेकांनी खटलेही दाखल केले. अनेक महिलांशी संबंध त्यातून झालेली पाच मुलं, ड्रग्स दारूपान अशाने तीनशे मिलियन डॉलरचा मालक (वीस अरब रूपये) २००३ ला स्वतःला दिवाळखोर घोषित करू लागला. त्यावेळी २३ मिलियन डॉलरचे कर्ज त्याने सांगितले. यात फुटबॉलपटू डेव्हिड जेम्स, इंग्लंडचा ली हँडरी, जॉन अर्ने रेस, कॅमेरूनचा एरीक जेम्बा, मार्क बर्नल, वॉरेन सैप, अशी बरीच नावे सांगता येतील. पैकी सैपकडे ५७० कोटींची मालमत्ता होती. खेळातून नाव पैसा सहज मिळत असल्याने मोकळ्या हाताने खर्च किंवा नको त्याठिकाणी गुंतवणूक, घटस्फोटाची खर्चिक प्रकरणं अशी बरीच करणं यामागे आहेत.

विम्बल्डन सुंदरीची पन्नाशी!

एकाच वर्षात चार ग्रँड स्लॅम, ऑलिम्पिक विजेतेपद असा विक्रम करणारी स्टेफी ग्राफ, जिचा ग्राफ नेहमीच उंचीवर राहिला! १४ जून १९६९ हिचा जन्म. २२ ग्रँड स्लॅम मिळवणारी, टेनिसचं सुंदर स्वप्नच म्हणा ना! मंद स्मित, गोरापान वर्ण, उभं धारदार नाक, पोनीटेल, सौम्य नाजूक-आकर्षक चेहरा, टेनिस विश्वाची माधुरीच होती त्यावेळी! मैदानावर कणखर, खणखणीत फटके देत प्रतिस्पर्धी हैराण नि पराभूत! चार ऑस्ट्रेलियन ओपन, सात विम्बल्डन, पाच अमेरिकन ओपन, सहा फ्रेंच ओपन नि ऑलिम्पिक पद असा खेळ फक्त सध्याच्या सेरेना विल्यम्सकडे!

पुरूषी दिसणारी वावरणारी मार्टिना नवरातिलोव्हा, मोनिका सेलेस, मारिया शारपोवा आदींच्यापेक्षा वेगळीच. बक्कळ पैसे कमावून योग्यवेळी बाजूला होणारी. आंद्रे आगासीशी लग्न करून संसार केला तिने! बोरिस बेकरच्या निमित्ताने तीही आठवली कारण त्याच्या कर्जासाठी लीलाव नि तिचा जन्मदिन एकाच महिन्यात. काही काळ दोघांचं एकत्र नाव घेतलं जायचं. मात्र, ती राणीसारखीच वावरली नि जगतेय. ग्राफ वर ठेऊनच!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content