Details
सोशल बुलिइंग आणि त्याचे धोके!
01-Jul-2019
”
कार्लटन डिसोझा, काऊन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, रहेजा फोर्टीस हॉस्पिटल
इंटरनेटच्या कृपेने आणि वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्स सुरू झाल्यापासून आपली आजची पिढी, विशेषत: नवतरूण मंडळी या आधुनिक प्रवाहांच्या दुष्परिणामांनाही सामोरी जात आहे. सोशल बुलिइंग किंवा समाजमाध्यमांवर चालणारी दादागिरी ही दंडेलशाहीच आहे, ज्यात कुटील हेतू बाळगून जाणिवपूर्वक इतरांचे सामाजिक स्थान आणि नातेसंबंधांना धक्का देण्याचा प्रयत्न केला जात असतो. प्रत्यक्ष होणारी दमदाटी किंवा दादागिरी सहज समजून येते. इतरांच्या नातेसंबंधांना इजा पोहोचवणारे हे ‘रिलेशनल बुलिइंग’ बुरख्याआड दडलेले असते आणि कुणाच्याही लक्षात न येता दीर्घकाळ सुरू असते.
सोशल बुलिइंग हा प्रकार किशोरवयीन मुलं आणि तरूणांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतो. सर्वेक्षणांतून असे दिसून आले आहे की, ५०%हून अधिक लोकांनी कधी-ना-कधी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या सोशल बुलिइंगचा अनुभव घेतला आहे. सोशल बुलिइंग शाळा, कॉलेज, ऑफिस असं कुठेही होऊ शकते, समोरच्याचा आत्मसन्मान खच्ची करणं, त्यांचं मन दुखावणं हाच त्याचा हेतू असतो. अशाप्रकारची दादागिरी ओळखणं कठीण असतं, कारण बरेचदा ती व्यक्तीच्या अपरोक्ष केली जात असते. काहीवेळा हा प्रकार करणाऱ्यांचे लक्ष्य ठरलेल्या व्यक्तीला त्यामागचं कारणही असतं, पण बरेचदा ते याबाबत अनभिज्ञ असतात. खोटे बोलणे, खोट्या अफवा पसरवणे आणि गॉसिप्स पसरवणे किंवा इतरांना एखाद्या व्यक्तीच्या विरोधात वळवणे, एखाद्याला सतत बहिष्कृत केल्यासारखे वागवणे आणि इतरांनाही तसेच करण्याच्या भरीस पाडणे, त्या व्यक्तीच्या पोस्ट्स किंवा इमेजेसवर नकारात्मक कमेंट्स पोस्ट करत राहणे, अपमानकारक नावं ठेवणे आणि हा प्रकार थांबवण्याची वारंवार विनंती करूनही ती कानाआड करणे अशा सगळ्या प्रकारांचा सोशल बुलिइंगमध्ये समावेश होतो, ज्याची परिणती अंतिमत: कुणाच्यातरी सामाजिक प्रतिष्ठेचे धिंडवडे निघतात किंवा सामाजिक पातळीवर त्या व्यक्तीचा स्वीकार केला जात नाही. थट्टामस्करीचा सूर असा भीतीदायक दंडेलीमध्ये बदलत जातो तेव्हा एखाद्यासाठी हे सगळे स्वीकरणे कठीण असू शकते.
सायबर बुलिइंग हा हळूहळू मनाचा ताबा घेणारा प्रकार आहे, तर सोशल बुलिइंग हे सतत सुरूच असते आणि या दुष्टकृत्यात एकाहून जास्त व्यक्तीही सहभागी असू शकतात. एखाद्याबद्दल खोटी माहिती पसरवणे, एखाद्या व्यक्तीवर जाहीर निंदा, राग काढणे किंवा उद्दाम भाषा वापरणे, कुणाच्या दिसण्यावरून, त्यांच्या सामाजिक पार्श्वभूमीवरून कधी-कधी त्यांच्या जातीवंशावरून किंवा अगदी अभ्यासातल्या कामगिरीबद्दलही चिडवले जाते. समाजमाध्यमांवरच्या या गुंडांपैकी काहीजण काही विशिष्ट माहिती काढून घेण्यापुरती आपली खरी ओळख लपवूनही हा प्रकार करतात आणि मग तीच माहिती इतरांकडे उघड करतात. अशा सोशल बुलिइंगचे परिणाम दूरगामी असतात. याला सामोरे जाणाऱ्या व्यक्ती बरेचदा नैराश्य, समाजापासून तुटणे, ताणतणाव, खालावलेला आत्मसन्मान, राग किंवा आक्रमकपणा या गोष्टींचे बळी ठरतात. सामाजिक आणि मानसिक दडपणामुळे अशी माणसं काहीवेळा आत्महत्त्येच्या विचाराकडेही वळू शकतात किंवा त्यांच्यामध्ये इतरांना इजा पोहोचवण्याची प्रवृत्ती बळावू शकते.
काही माणसे बुली किंवा गुंड मनोवृत्तीची का बनतात याची विशिष्ट कारणे असू शकतात. इतरांचे लक्ष्य वेधून घेण्याची मनोवृत्ती, इतरांवर छाप पाडण्याची या मंडळींची इच्छा इतकी प्रबळ असते की, ते मिळवण्याचा मार्ग सकारात्मक आहे की नकारात्मक आहे याचा विचारही ते करत नाहीत. यातून आपण इतरांचा आदर मिळवत आहोत, आपल्या समवयीन लोकांमध्ये लोकप्रिय होत आहोत असे त्यांना वाटत असते. काहीवेळा एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारी ईर्ष्या व्यक्त करण्याचा तो एक मार्ग असतो. कारण काहीही असो, आपल्याला चांगलं वाटावं म्हणून इतरांचा आत्मसन्मान खच्ची करण्याचा, त्यांच्यावर दादागिरी करण्याचा कुणालाही अधिकार नाही. असे प्रकार रोखण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये एकसंघता आणून ते दीर्घकाळ उपयुक्त ठरावेत काय करता येईल?
कोणत्याही प्रकारचे बुलिइंग गंभीरपणे घ्यायला हवे आणि ते रोखण्यासाठी व परिणामकारक उपाययोजनाही हाती घ्यायल्या हव्या. दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला परिणामांचीही स्पष्ट कल्पना दिली जायला हवी. आज, भारतामध्ये अत्यंत सुस्पष्टपणे मांडलेला अँण्टी-बुलिइंग कायदा अस्तित्त्वात आहे. आपापल्या अखत्यारीत गुंडगिरी रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे ही शाळा/संस्थांची जबाबदारी आहे. शाळापातळीवर गुंडगिरीविरोधातील परिणामकारक उपाययोजनांमध्ये विद्यार्थी, कुटूंबं आणि शाळेतील कर्मचारीवर्ग या सगळ्यांना हे प्रकार रोखण्यासाठीच्या प्रयत्नांत सामील करून घेणारा सामाजिक-पर्यावरणीय, समग्र शाळेसाठी लागू होणारा दृष्टिकोन स्वीकारणे, त्याचबरोबर शाळेच्या प्रत्येक संदर्भात सकारात्मक वागणुकीची अपेक्षा सातत्याने मांडत राहणे, गुंडगिरीच्या विरोधात सुस्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारणे, धोक्याच्या प्रत्येक पायरीवर असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेईल असा दृष्टिकोन स्वीकारणे, मोठया व्यक्तीकडून देखरेख ठेवली जाणे आणि शिक्षकांना दादागिरीच्या घटनांना परिणामकारकरित्या हाताळण्याचे प्रशिक्षण देणे तसेच परिणामकारक वर्ग व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे या गोष्टींचा समावेश होतो.
बुलिइंगचे लक्ष्य ठरलेल्यांना आधार देणे: बुलिइंगला सामोरे जाणा-या व्यक्तींवर या दंडेलशाहीचे कोणते शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिणाम होणे शक्य आहे याचे पद्धतशीर मूल्यमापन करणे आवश्यक आहे. दादागिरी करणाऱ्यांचे वागणे सहन केले जाणार नाही हे बळी पडलेल्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगणे; अशी वागणूक मिळण्यासारखी कोणतीही चूक लक्ष्य झालेल्या व्यक्तीने केलेली नाही असा दिलासा त्यांना देणे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा व्यक्तीच्या वागणुकीमध्ये किंवा मानसिक आरोग्यावर होणारे विपरित परिणाम टाळण्यासाठी किंवा अशा व्यक्तींनी या वागणुकीला चांगल्याप्रकारे सामोरे जावे यासाठी त्यांना पाठबळ देणेही आवश्यक आहे. शाळा किंवा कॉलेजमधले समुपदेशक हे पाठबळ पुरवू शकतील किंवा अशा व्यक्तींना मानसोपचारतज्ज्ञांकडेही पाठवता येईल.
गुंडगिरी करणाऱ्या व बळी ठरणाऱ्या तरूणांसाठी पालकत्वाच्या पद्धतीत बदलाची गरज: एखादी व्यक्ती गुंडगिरी करण्याकडे का वळते याचा शोध घेताना पालकांकडून मानसिकदृष्ट्या घातली जाणारी बंधने किंवा पुरेशा जोपासनेचा अभाव असलेली संगोपन पद्धती ही कारणे असल्याचे आढळून आले आहे. काही पालक आपल्या मुलांकडे पुरेसे लक्ष देत नाहीत किंवा करड्या शिस्तीचा अतिरेक केला जातो. अशा पालकांकडून मुलांना खूप कमी मानसिक आधार मिळतो. ज्या मुलांचे पालक दुसऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी किंवा प्रेम मिळविण्यासाठी किंवा आपल्या सत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी ‘रिलेशनल मॅन्युप्युलेशन’ अर्थात नातेसंबंधांचा कुटील वापर करण्याचे तंत्र वापरतात किंवा ज्या मुलांच्यार पालकांचे समाजातील, आपल्या कुटुंबाशी व मित्रमंडळींशी वागणे आक्रमक आणि आक्रस्ताळे असते अशी मुले सोशल बुलिंगला जास्त प्रमाणात बळी जाण्याची शक्यता असते.
पालकांनी मुलांशी संवाद साधण्यासाठी दिवसातला किमान काही काळ बाजूला काढायला हवा आणि मुलांच्या व्यक्तिमत्वाची जोपासना करणारे, त्यांना स्वीकारणारे वातावरण त्यांच्याभोवती उभे केले पाहिजे. अशा वातावरणात मुलांना आपणही महत्त्वाचे आहोत, आपलेही म्हणणे ऐकून घेतले जात आहे असे वाटेल. त्याचबरोबर पालकांनी मुलांसमोरचा सर्वोत्तम आदर्श बनण्याचा प्रयत्नही करायला हवा, जे पाहून मुलांनाही त्याचे अनुकरण करावेसे वाटेल.”
“कार्लटन डिसोझा, काऊन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, रहेजा फोर्टीस हॉस्पिटल