HomeArchiveमुंबईच्या नॅशनल पार्कमधल्या...

मुंबईच्या नॅशनल पार्कमधल्या २७ हजार कुटुंबांना म्हाडाची घरे! सभापती मधू चव्हाण यांची घोषणा

Details
मुंबईच्या नॅशनल पार्कमधल्या २७ हजार कुटुंबांना म्हाडाची घरे! सभापती मधू चव्हाण यांची घोषणा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

मुंबईतल्या बोरिवली येथील नॅशनल पार्कमधील दोन हजार आदिवासी व २४ हजार ९५९ पात्र झोपडी धारकांच्या पुनर्वसनाचा आराखडा म्हाडाने तयार करून म्हाडाच्या मुंबई मंडळाने त्यासाठी निविदा जारी केल्या आहेत, अशी माहिती मुंबई म्हाडाचे सभापती मधू चव्हाण यांनी बुधवारी दिली. या पुनर्वसनाचे बांधकाम विकासकांना टीडीआर देण्याच्या अटीवर देण्यात आले  असल्याने म्हाडाला यासाठी निधी उपलब्ध करावा लागणार नाही. यामुळे  नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि तेथील झोपडी धारकांचा अनेकवर्षे रखडलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे. सुमारे ९० एकर जागेवर आदिवासी आणि झोपडी धारकांसाठी घरे बांधली जाणार आहेत, असे ते म्हणाले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि  झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात यापूर्वी आदिवासी व झोपडी धारकांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले असून आता दुसऱ्या टप्प्यात नॅशनल पार्कमधील दोन हजार आदिवासी आणि २४ हजार ९५९ पात्र झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्यात येईल. या पुनर्वसनाचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने येथील पुनर्विकासाच्या कामाला सुरूवात केली. नॅशनल पार्कमधील आदिवासींचे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर आता तेथील घरांच्या बांधकामासाठी म्हाडाने निविदा मागविण्यास सुरूवात केली आहे, असे मधू चव्हाण म्हणाले.

या निविदानुसार आदिवासींना ३०० चौरस फुटांचे बांधकाम असलेले एक मजली घर बांधून देण्यात येणार आहे. ४३ एकर जागेवर हीघरे बांधली जाणार आहेत तर झोपडी धारकांचे पुनर्वसन एसआरए योजनेंतर्गत केले जाणारआहे. त्यासाठी ४७ एकर जमिनीवर त्यांच्यासाठी बहुमजली इमारती बांधल्या जातील.आदिवासी आणि झोपडीधारकांसाठी एकूण ९० एकर जागेवर पुनर्वसनाचे काम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.”
 
“मुंबईतल्या बोरिवली येथील नॅशनल पार्कमधील दोन हजार आदिवासी व २४ हजार ९५९ पात्र झोपडी धारकांच्या पुनर्वसनाचा आराखडा म्हाडाने तयार करून म्हाडाच्या मुंबई मंडळाने त्यासाठी निविदा जारी केल्या आहेत, अशी माहिती मुंबई म्हाडाचे सभापती मधू चव्हाण यांनी बुधवारी दिली. या पुनर्वसनाचे बांधकाम विकासकांना टीडीआर देण्याच्या अटीवर देण्यात आले  असल्याने म्हाडाला यासाठी निधी उपलब्ध करावा लागणार नाही. यामुळे  नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि तेथील झोपडी धारकांचा अनेकवर्षे रखडलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे. सुमारे ९० एकर जागेवर आदिवासी आणि झोपडी धारकांसाठी घरे बांधली जाणार आहेत, असे ते म्हणाले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि  झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात यापूर्वी आदिवासी व झोपडी धारकांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले असून आता दुसऱ्या टप्प्यात नॅशनल पार्कमधील दोन हजार आदिवासी आणि २४ हजार ९५९ पात्र झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्यात येईल. या पुनर्वसनाचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने येथील पुनर्विकासाच्या कामाला सुरूवात केली. नॅशनल पार्कमधील आदिवासींचे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर आता तेथील घरांच्या बांधकामासाठी म्हाडाने निविदा मागविण्यास सुरूवात केली आहे, असे मधू चव्हाण म्हणाले.

या निविदानुसार आदिवासींना ३०० चौरस फुटांचे बांधकाम असलेले एक मजली घर बांधून देण्यात येणार आहे. ४३ एकर जागेवर हीघरे बांधली जाणार आहेत तर झोपडी धारकांचे पुनर्वसन एसआरए योजनेंतर्गत केले जाणारआहे. त्यासाठी ४७ एकर जमिनीवर त्यांच्यासाठी बहुमजली इमारती बांधल्या जातील.आदिवासी आणि झोपडीधारकांसाठी एकूण ९० एकर जागेवर पुनर्वसनाचे काम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.”
 
Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content