HomeArchiveनवभारतीय शिव वाहतूक...

नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा शुभारंभ!

Details
नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा शुभारंभ!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

सिनेअभिनेत्री ईशा कोपीकर यांचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकांचा रणसंग्राम जसजसा जवळ येऊ लागलाय तसतसे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमधील वातावरण तापू लागले आहे. त्यातच भाजपाने रविवारी राष्ट्रीय स्तरावरच्या वाहतूक संघटनेची घोषणा करत शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. मुंबईत माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात एका भव्य सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपाप्रणित राष्ट्रीय स्तरावरच्या नवभरतीय शिव वाहतूक संघटनेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याचवेळी सिनेअभिनेत्री ईशा कोपीकरचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश झाला. ईशा कोपीकरला वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तिचे पक्षात स्वागत केले.

या सोहळ्याला संघटनेचे प्रमुख आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार अमर साबळे, आमदार कॅप्टन तमिळ सेल्व्हन उपस्थित होते. वाहतुकदारांनी सुरक्षित, फायदेशीर, प्रदूषणमुक्त वाहतूक करावी, यासाठी भाजपा सरकारने नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून जलवाहतूक वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले.

मुळात साडेसात लाख सदस्य असलेल्या हाजी अरफात शेख यांच्या नेतृत्त्वाखालील वाहतूक सेना शिवसेनाप्रणित होती. परंतु राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याने संघटनेचे नेते हाजी अरफात शेख यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून वाहतूक सेनेबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. भाजपाने आता या संघटनेची घोषणा करत सेनेवर कुरघोडी केली आहे, असे मानले जाते. त्यातच ईशा कोपीकरचा प्रवेश संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करेल, असा विश्वास हाजी अरफात शेख यांनी यावेळी व्यक्त केला.

माझ्यासाठी हा अत्यंत अविस्मरणीय आणि महत्त्वाचा क्षण असल्याचा ते म्हणाले. मी वाहतुकदारांसाठी पूर्वीही लढत होतो, आताही लढत आहे आणि भविष्यातही अखेरपर्यंत लढत राहीन असे ते म्हणाले. माझे वडील जेव्हा इस्पितळात कोमामध्ये अखेरचा जीवनसंघर्ष करत होते तेव्हाही मी ताज हॉटेलच्या कामगारांसाठी लढत होतो. आजही तीच स्थिती आहे. आमच्या कुटुंबाचे मुख्य पीर बाबा मखमली यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचा दफनविधी अजून बाकी आहे. तरी मी राष्ट्रीय स्तरावर वाहतुकदारांच्या संघर्षासाठी आज येथे उभा आहे. संघटनेची मशाल अशीच तेवत ठेवा, असे भावनिक आवाहन शेख यांनी उपस्थित रिक्षा, टॅक्सी, टेम्पो आणि ट्रक चालक-मालक वाहतुकदारांना केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content