HomeArchiveजोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर...

जोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारा – रविंद्र वायकर

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबई ही क्रिकेटची पंढरी समजली जाते. अशातच मुंबईच्या शहर, पूर्व व पश्‍चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळण्यात येते. परंतु पूर्व उपनगरांतील उदयोन्मुख खेळाडूंना अद्ययावत क्रिकेटचे स्टेडियम नसल्याने जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या भुखंडावर क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात यावे, अशी विनंती विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.

पश्‍चिम उपनगराबरोबरच पूर्व उपनगरातील अनेक क्रिकेटपटू राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राज्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु जोगेश्‍वरी परिसरात व उपनगरांमध्ये क्रिकेट या खेळाकरीता स्टेडियम उपलब्ध नसल्याने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपले क्रीडानैपूण्य चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस आरे येथे असलेला रिक्त भूखंड स्टेडियमसाठी आरक्षित करणे आवश्यक असल्याचे वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

याठिकाणी अद्यावत स्टेडियम उभे राहिल्यास क्रिकेटपटूंच्या नैपुण्यात अधिक चांगल्या पद्धतीने वाढ तर होईलच, पण यामुळे राज्याचे तसेच देशाचादेखील नावलौकीक वाढण्यास मदत होईल. देशासाठी भावी क्रिकेटपटू तयार करण्यासाठी या स्टेडियमच्या उभारणीसाठी येणारा खर्च, हा खर्च न समजता भविष्यातील तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी गुंतवणूक असणार असल्याचे मतही वायकर यांनी व्यक्त केले आहे.

उदयोन्मुख खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करुन आरेमध्ये उपरोक्त आरक्षित जागेवर वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ५० कोटींची विशेष तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content