HomeArchiveमहायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात...

महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार राहुल शेवाळे यांच्या विजयाचा संकल्प!

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी रविवारी सायंकाळी दादरच्या कामगार क्रीडा मैदानात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राहुल शेवाळे यांना दक्षिण-मध्य मुंबईतून पुन्हा एकदा लोकसभेत पाठविण्याचा निर्धार केला. या मेळाव्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, उपनेते सूर्यकांत महाडिक, उपनेते सुबोध आचार्य, आमदार सदा सरवणकर, प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, नगरसेविका राजश्री शिरवाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, माजी महापौर श्रद्धा जाधव, आरपीआयचे पदाधिकारी सिद्धार्थ कासारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

दक्षिण-मध्य मुंबई, हा मतदारसंघ शिवसेना-भाजप-आरपीआय, या तिन्ही पक्षांसाठी भावनिकदृष्टया महत्त्वाचा आहे. शिवसेना भवन, भाजप मुंबई कार्यालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक, चैत्यभूमी अशा वास्तू या मतदारसंघात आहेत. या तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या मेहनतीमुळे मला गेल्या निवडणुकीत खासदारकीचा बहुमान मला मिळाला. गेल्या पाच वर्षांत मी केलेल्या कामांच्या जोरावर आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा आपण विजयी होऊ, अशा शब्दांत राहुल शेवाळे यांनी या मेळाव्यात आपले विचार मांडले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही लांडग्याची फौज आहे. वाघ आणि सिंह कधी फितूर होत नाही. लांडगे फितूर होतात. धारावीच्या पुनर्विकासाचे स्वप्न राजीव गांधी यांची सत्ता असल्यापासून दाखवले जात होते. मात्र, खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे धारावी पुनर्विकास प्रत्यक्षात सुरूवात झाली. मुंबईच्या सीआरझेडमुळे मूळ मुंबईकरांच्या गावठाणे-कोळीवाड्यांच्या विकासात बाधा आणणारा सीआरझेड हटविण्यासाठी राहुल शेवाळे यांनी संसदेत मागणी केली. यामुळे राहुल शेवाळे यांना मत देणं गरजेचं आहे, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जो स्वतःचा एक आमदार किंवा नगरसेवक निवडून आणू शकला नाही, तो दुसऱ्यांना निवडून आणायला निघालाय, अशा शब्दांत शेलार यांनी मनसेवर टीका केली.

दक्षिण-मध्य मुंबईतून जो निवडून येतो, तो कधी न कधी मुख्यमंत्री बनतो. या निवडणुकीत हिंदुत्व निवडून येणार, हे नक्की!, असं माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी म्हणाले. दक्षिण-मध्य मुंबईतील दादर, वडाळा आणि धारावी या तीन विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याला तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...

युपीआय आणि रुपे व्यवहारांवरच्या शुल्कामागे अमेरिकेचा दबाव?

युपीआय आणि रुपे कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर लवकरच 'मर्चंट डिस्काउंट रेट' (एमडीआर) म्हणजेच शुल्क लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने नुकतेच संसदेत 'टॅक्सेशन अँड अदर लॉज (अमेंडमेंट) बिल २०२६' मंजूर केले आहे. यामुळे, सध्याच्या 'झीरो-एमडीआर' (मोफत व्यवहार) धोरणात...
Skip to content