Details
बोरीवलीत रक्तदान शिबीर व गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय जनता पार्टी, बोरीवलीच्या वतीने लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी व राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बोरिवलीच्या, शिंपोलीच्या प्रार्थनालय येथे आयोजित रक्तदान शिबीर व गोखले कॉलेज जवळील मेघा पार्टी हॉल येथे विद्यार्थी सन्मान सोहळ्याचे नुकतंच आयोजन करण्यात आले होते.
बोरीवलीतील शालांत परीक्षा तसेच 12वी व पदवीधर अशा एकूण 300 विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार गोपाळ शेट्टी याच्या हस्ते धनादेश, भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. पुढच्या आयुष्याला वळण देणारे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी सर्व 286 रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन त्यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते इयत्ता 10 वी 12वी आणि पदवी परिक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रू 15000, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना रू. 10000 पुढच्या 20 विद्यार्थ्यांना प्रत्येकाला रूपये 5000 आणि पुढील 40 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 3000 अशी 320000 रूपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. याच कार्यक्रमात खासदार शेट्टी यांनी 10वीत सर्वप्रथम आलेल्या इशिता गुप्ता 98.20% 12वीत सर्वप्रथम 95.60 जशी मुनी आणि बीएसइ पदवी परिक्षेत सर्वप्रथम आदेश सावंत 85.38% यांचा 15000 रूपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात प्रणव राऊत याच्या भविष्य उज्वल गीताने तर जेम्स यांनी स्किल डेव्हलपमेंट आणि स्टार्टअप इंडियाच्या मार्गदर्शनाने झाली. या कार्यक्रमाला उत्तर मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, उपाध्यक्ष मोहन मिठबावकर, बोरीवली अध्यक्ष दीपक पाटणेकर, नगरसेवक प्रवीण शाह, विद्यार्थी सिंह नगरसेविका आसावरी पाटील, नगरसेविका अंजली खेडकर, नगरसेविका बीना दोशी यांनी ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शरद साटम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर या कार्यक्रमाचा समारोप महेश राऊत यांनी केला. यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
”
“केएचएल न्यूज ब्युरो