Details
वाचावं असं काही दिवाळी अंक ३ – साहित्य
01-Jul-2019
”
महेश पवार
[email protected]
आज लिहीत आहे विविध पुरस्कारांची माहिती देणाऱ्या `साहित्य’ या दिवाळी अंकाविषयी.
माझ्या माहितीतील अनेकांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. अनेक पुरस्कारांनी त्या व्यक्तींची दखल घेतली आहे. एक दोन,पाच, पन्नास नव्हे अगदी शंभराहून अधिक पुरस्कार प्राप्त व्यक्तींना अगदी जवळून अनुभवलं आहे. प्रत्येक व्यक्तीला पुरस्कारांची आस असतेच. त्याचं त्याला फार अप्रुप असतं. अर्थात त्यामागे त्याव्यक्तीची तितकी मेहनतही असते आणि हे मी कुठेही नाकारत नाही. कदाचित अशाच लहान-मोठ्या पुरस्कारांमधून त्याची निवड मोठ्या प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या पुरस्कारासाठी निवड होत असावी. साहित्य क्षेत्रातील मानाचे, प्रतिष्ठेचे पुरस्कार कोणते याची माहिती आपल्याला साहित्य, या दिवाळी अंकातून मिळते.
नोबेल, ज्ञानपीठ, साहित्यअकादमी, सरस्वती सन्मान, जनस्थान या पुरस्कारांबरोबरच मुंबई मराठी साहित्य संघातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची माहिती यात देण्यात आली आहे. हे पुरस्कार देण्यामागची पार्श्वभूमी या अंकात विषद करण्यात आली आहे. येथे मीमुद्दाम उल्लेख करू इच्छितो की, यंदाफक्त नोबेल पुरस्कार प्राप्त व्यक्तींवर एक विशेषांक प्रसिध्द झाला आहे. गेली सातवर्षं `ताऱ्यांचे जग’ हा दिवाळी अंक वाचकांसमोर घेऊन येणारी भरारी प्रकाशनची सर्वेसर्वा आणि संपादिका मैत्रिण लता गुठे हिने हा विशेष अंक प्रसिध्द केला आहे. नोबेल पारितोषिकाचा इतिहास ते शास्त्रज्ञ फेनमन, साहित्य पुरस्कार विजेते विन्स्टन चर्चिल, मायेचा सागर मदर तेरेसा, गॅब्रियल गार्सिया मार्केझ, डॉ. रूल्डा बक, रेखा नार्वेकर यांनी लिहिलेला सुख-दुखःचा शोध घेणारी टोनी मॉरिसस, गौरी कुलकर्णींचा गीतांजली, नोबेल आणि काव्यलेणी, प्रा. प्रतिभा सराफ यांचा अलौकिक बुध्दिमत्तेचा आईन्स्टाईन, अमर्त्यसेन, दलाई लामा, सर काझुओ इशिगुरो, कैलास सत्यार्थी अशा एकूण २४ पुरस्कार प्राप्त व्यक्तींची माहिती या विषेशांकातून दिली आहे. वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखा हा लता गुठेयांचा हा नोबेल पारितोषिक पुरस्कार विषेशांक आहे हे इथे नमूद करावेसे वाटते.
साहित्य, या अंकाची सुरूवातच नोबेल पुरस्काराने झाल्याने हे थोडे विषयांतर झाले होते. नोबेलबद्दल विलास कोलेयांनी अत्यंत समर्पक माहिती दिली आहे. आंतराष्ट्रीय पुरस्कारा पाठोपाठ या अंकामध्ये चंद्रकांत भोजांळ यांनी राष्ट्रीय पुरस्कार ज्ञानपीठची माहिती दिली आहे. ज्ञानपीठाची स्थापना१९४४ साली झाली. पण हा पुरस्कार १९६५ पासून देण्यास सुरूवात झाली. या काळात १६ भाषांचा विचार या पुरस्कारासाठी विचार होत होता. २००३ पासून या पुरस्कारासाठी २२ भाषांचा विचार करण्यात येऊ लागला. इथपासून ते ज्ञानपीठ पुरस्काराच्या निवडीपर्यंतची प्रक्रिया लेखकाने आपल्यासमोर विषद केली आहे. त्यानंतर ओघाने साहित्य पुरस्काराचा विषय घेण्यात आला आहे. मीना वैशंपायन यांनी साहित्य अकादमी पुरस्कार : स्वरूप व विस्तार, या शिर्षकांतर्गत लिहिलेल्या लेखात साहित्य अकादमीचा विस्तार ते पुरस्कार हा प्रवास छान गुंफला आहे. इतकेच नव्हे तर साहित्य अकादमी पुरस्कार नाकारणाऱ्या लेखकांची माहितीही छोट्याछोट्या उताऱ्यातून समोर आणली आहे.साहित्य हा संस्कृत भाषेतील तर ग्रीक भाषेतील अकॅडमी या दोन शब्दांचा मिलाफ करत साहित्य अकादमी हे नाव निश्चित केल्याचेही त्या आर्वजून लिहितात.
बिर्ला फांऊडेशनचा पाच लाखांच्या सरस्वती सन्मान, या पुरस्काराबद्दल लिहिते झालेत चंद्रकांत भोंगाळ तर अनुपमा उजगरे यांनी जनस्थान पुरस्काराचे महत्त्व सांगितले आहे. आपल्या लेखणीने साहित्यसेवा करणाऱ्या साहित्यिकाला असाच मान लाभला पाहिजे या हेतूने प्रतिष्ठित ज्येष्ठ साहित्यिकाने मराठी साहित्यिकांसाठी सुरू केलेला हा पुरस्कार. ते ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे ज्ञानपीठ विजेते पद्मभूषण वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. आतापर्यंत मिळालेल्या चौदा लखलखत्या रत्नांची माहितीही या लेखात दिली आहे. यासोबतच निलीमा भावे, अरूण नेरूरकर, राम देशपांडे, सुहासिनी कीर्तिकर, मीनागोखले, नंदिनी आत्मसिद्ध यांनी साहित्य, या अंकामध्ये पुरस्कार प्राप्त लेखकांविषयी लेख लिहिले आहेत. अन्य भाषेतील कवींच्या कवितांचे अनुवाद अनुक्रमेनीरजा- मल्याळी, सुजाता राणे- पंजाबी, प्रकाश भातम्ब्रेकर- गुजराती, श्रीप्रकाश अधिकारी- तामीळ, प्रा. प्रतिभा सराफ- कानडी यांनी केले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची मुलाखत रेखा नार्वेकर यांनी घेतली आहे तर, नविन युवा साहित्यिक राहुल कोसंबी याची मुलाखत समीर जाधव याने घेतली आहे. जुन्याकडून नव्याकडे अशा स्थित्यंतराचा हा प्रवास आहे. मुंबई मराठी साहित्य संघाचा विविध पुरस्कारांची माहिती देणारा हा अंक केवळ वाचनीय नाहीतर कित्येक वर्षं पुस्तकांच्या रॅकमध्ये सामावणारा असाच आहे. जेव्हा गरज भासेल तेव्हा रॅकमधून काढा, वाचा आणि तृप्त व्हा!!
साहित्य
संपादिका : सुरेखासबनीस
प्रकाशक : उज्वलामेहेंदळे
मुखपृष्ठ : सतीशभावसार
किंमत : १२० रूपये”
“महेश पवार