Details
“अभिनंदन, आम्ही नाडलोय रे स्लीपर्स सेलने!”
01-Jul-2019
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
प्रिय अभिनंदन,
जयहिंद..
तू मायदेशी येणार म्हणून देशवासियांचे सारे लक्ष सकाळपासून अटारी-वाघा सीमेकडे होते. अखेर पाकड्याने तुला रात्री ९ वाजता वाघा बॉर्डरवर आणले व ती प्रतीक्षा संपली. अभिनंदन तुझं मित्रा.. तू आलास आणि जीव भांड्यात पडला, बघ. हे पाकडे काय करतील याचं काय सांगता येत नाही. त्या कुलभूषण जाधवला दुबईतून उचलून पाकिस्तानमध्ये नेले नि भारताचा हेर म्हणून खोटे आरोप त्याच्यावर ठेवून त्याला नजरकैदेत ठेवले आहे. ते पाकडे इतके नालायक की, त्याला भेटायला गेलेल्या त्याच्या आईचे व पत्नीचे मंगळसूत्र आणि चप्पल काढून कुलभूषणबरोबर संवाद करण्यास लावले, तेही दोघांमध्ये काचेची भिंत म्हणजे ते त्याला स्पर्शही करू शकले नाहीत. इतका नीचपणा पाकड्याने त्यावेळी दाखवला होता. म्हणूनच मित्रा तुझी काळजी वाटत होती.
प्रत्यक्ष ताबा रेषेजवळच्या होरान गावात तुझं मिग विमान कोसळण्याच्या बेतात असताना तू पॅराशूटच्या सहाय्याने उडी घेतलीस. एका तळ्याजवळ उतरल्यानंतर तेथील पाक तरुणांनी तुला ठेचण्याचा प्रयत्न केला. पण आपले क्रिकेटपटू कसे आगाऊ पाकला बॅटने उत्तर देतात अगदी तसेच तू केलेस बघ. हा प्रसंग लाईव्ह असता तर प्रत्येक भारतीयाने ती क्लिप जपून ठेवली असती. तू त्या पाकिस्तानी तरुणांना बंदुकीच्या धाकावर ठेवलेस. १९६५ च्या भारत-पाक युद्धात अब्दुल हमीद या आपल्या शूर जवानाने पाकड्यांचे पाच रणगाडे उद्ध्वस्त केले होते, अगदी बेचिराख केले होते. त्या प्रसंगाची आवर्जून आठवण येते अभिनंदन.. कारण तुला मारायला टपलेल्या त्या तरुणांना तू हिसका दाखवला आणि त्यावेळी तुझ्याकडे असलेले महत्त्वाचे कागदपत्रं तू गिळलेस! याला म्हणतात प्रसंगाचे भान आणि तुझ्या रक्तात भिनलेली देशभक्ती! खरोखर सलाम तुला आणि तुझ्या आईवडिलांना..
तुझ्या या कर्तृत्त्वाने देशात प्रत्येकाच्या रक्तात देशभक्ती संचारली होती. मित्रा अभिनंदन, तुझे आईवडील तुला भेटण्यासाठी चेन्नईहून निघाले तेव्हा विमानातून प्रवास करत असताना अभिनंदनचे आई-वडील असल्याचे कळताच सर्व प्रवाशांनी त्यांचे ‘अभिनंदन’ केले आणि दिल्लीच्या विमानतळावर विमान उतरताच सर्व प्रवासी आपल्या जागेवर उभे राहून प्रथम त्यांना विमानातून उतरण्यास दिले.. हा प्रसंग जगाने पाहिला असेल तेव्हा त्यांना भारतीयांची देशभक्ती रक्तात भिनल्याचं दिसून आले असेल. हा प्रसंग भारतीयांना अनेक वर्षे मानसिक बळ वाढविणारे आहे, म्हणून अभिनंदन, तुला सॅल्युट!
मित्रा अभिनंदन, तुझं कौतुक करत असताना मनात येतो तो देशात असलेल्या ‘स्लीपर्स सेल’चा धोका.. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षण तळ बेचिराख केल्यानंतर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचे समर्थक केव्हा काय करतील हे सांगता येत नाही. हे स्लीपर्स सेल कोठे असतात सांगू, तू ज्या ठिकाणी राहतोस त्याच्या आजूबाजूला, त्या परिसरात वावरत असतात. आमच्या मुंबईकरांचे जीवन फारच भयग्रस्त व धोकादायक आहे. गर्दीची ठिकाणे, रेल्वे डबे, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे, महाविद्यालये, लहान मुलांचे बस हे त्यांचे टार्गेट असते. आता तू बोलशील हे कोठून येतात? मित्रा अभिनंदन, आमची मुंबई म्हणजे एक धर्मशाळा आहे.. शिवबाच्या महाराष्ट्राची राजधानी असली तरी ही मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे, हे मात्र आमचे राजकीय नेते छाती बदडून सांगतात. पण हेच नेते मुंबईत कोठेही झोपडी बांधण्यासाठी हातभार लावतात. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा याच झोपडपट्टीत कोंबिंग ऑपरेशन होत असतं. आता मुंबईत तटरक्षक, नौदल, हवाईदल रात्रंदिवस पहारा ठेवून आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी अत्याधुनिक रडार पाकड्यांच्या विमानांचा वेध घेण्यासाठी लावले आहेत. बाहेरून होणाऱ्या हल्ल्यापेक्षा झोपडपट्टीत आसरा घेऊन राहणारे, भाडयाच्या घरात राहणारे हे छुपे दहशतवादी धोकादायक आहेत. आमचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे की, पाकिस्तानला आमच्यावर अणुबॉम्ब टाकण्याची काहीच गरज नाही कारण आमच्या झोपडपट्टीमध्ये दहशतवादी टपून बसलेले आहेत, ते पाकिस्तानसाठी अणुबॉम्बसारखे आहेत.
मित्रा अभिनंदन, हे वाचून तुला घाम फुटला असेल.. हो ना? याला कारणीभूत आहे ते आमचे राजकीय नेतेच. ते आपल्या देशवासियांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांच्यावर जोवर कारवाई होत नाही हा ‘स्लीपर्स सेल’ चा धोका काही संपणार नाही. दुसरं एक तुला सांगतो मित्रा अभिनंदन, आपल्या देशाने उपग्रह तयार करून मोठी प्रगती केली आहे. प्रगती म्हणजे इस्रोच्या उपग्रहामुळे आपण पाकिस्तानच्या ८७ टक्के भागावर सूक्ष्म नजर ठेवून आहोत. इतकंच काय उपग्रहामुळे आम्ही प्रत्येक पाकिस्तानी घरामध्ये वाकून पाहू शकतो. आहे की नाही आपली प्रगती? परंतु मुंबईतील आमचे नेते मंडळी झोपडपट्टीत वाकून बघू शकत नाहीत आणि पोलीस यंत्रणाही.. त्याला कारण देशभक्तापेक्षा वोटबँक महत्त्वाची आहे. या राजकारण्यांचा लष्कराशी काय संबंध? यांच्या घरातील एक तरी मुलगा लष्करात भरती होतो का? नाही. कारण त्यांनी सात पिढ्या पोसले जातील अशी वारेमाप संपत्ती जमा केली आहे. हे तर काहीच नाही, काही लोकप्रतिनिधी दहशतवाद्यांना पोसत आहेत. आमच्या एका महिला आमदाराने तिच्या निवासस्थानी काही संशयित दहशतवादी मुक्कामाला ठेवले होते, बोल आता याला काय म्हणावे? मुंब्राच्या इशरत जहाँ या दहशतवादी कॉलेज तरुणीला इतर दहशतवाद्यांसोबत गुजरात पोलिसांनी मारले आणि तिला वाचविण्यासाठी एक आमदार धावून आला. त्याने तिच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली. म्हणून तुला विनंती करतो जेव्हा तुझा यथोचित असा भव्य सत्कार करण्यात येईल तेव्हा अणुबॉम्बच्या रूपाने असलेल्या स्लीपर्स सेलचा आवर्जून उल्लेख कर..
तुला हे वाचून वेदना झाल्या असतील, परंतु या स्लीपर्स सेलचा नायनाट तूच करू शकतो, म्हणून हा पत्र प्रपंच..
तुला पुन्हा एकदा सॅल्युट..”
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार