HomeArchiveअसंस्कृत प्रचाराचे अभिव्यक्ती...

असंस्कृत प्रचाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य!

Details
असंस्कृत प्रचाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
यवतमाळ साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेतल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने मोठा गहजब झाला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे व्यक्त होण्याचे, मते मांडण्याचे, प्रतिवाद करण्याचे स्वातंत्र्य. आजच्या काळात ही अभिव्यक्ती अनेक माध्यमांतून समोर येते. ती बोलण्यातून असते, लिहिण्यातून असते, सोशल मीडियावर असते, छायाचित्रांत असते आणि अनेक प्रकारांनी असते. व्यक्त होणे हे आता एका विशिष्ट माध्यमापुरते मर्यादित राहिलेले नाही.

हे सगळे आता लिहायचे कारण म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आता प्रचाराची धमासान सुरू होईल. प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार घसा फोडून स्वत:बद्दल सांगेल, आपल्या कामांबद्दल सांगेल. तेवढाच कंठशोष करत प्रतिस्पर्धी उमेदवार, पक्षाच्या नावाने खडे फोडतील. प्रचाराच्या या रणधुमाळीत परस्परांवर आरोपांची, बदनामीकारक वक्तव्यांची चिखलफेक ही ठरलेलीच असणार आहे. परस्परांच्या घराण्यांचा उद्धार करण्यापर्यंत, हीन, असभ्य भाषेत दुत्कारण्यापर्यंत आणि परस्परांच्या वाडवडिलांची असभ्य भाषेत उणीदुणी काढण्यापर्यंत मजल गाठली जाणार आहे किंवा अधोगती गाठली जाणार आहे.

सुसंस्कृत प्रचाराचा एक काळ होता. आजचा काळ असंस्कृत प्रचाराचा आहे. तुम्ही जेवढे असंस्कृत बोलाल तेवढे बातमीत याल, लोकांच्या लक्षात राहाल आणि चर्चेत राहाल. कदाचित मते मिळवून विजयीही व्हाल, असा काही घटकांचा समज झाला आहे. अशा बिभत्स, असभ्य प्रचाराला आता उत येणार आहे. अशा असंस्कृत प्रचाराचा आपल्याला मुक्त परवाना आहे, ते आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, अधिकारच आहे असे मानून हे उमेदवार, कार्यकर्ते प्रचार करत असतात.

गेल्या आठवड्यात वाडा तालुक्यातील कुडूस येथे विजय जोगमार्गे सर या साहित्यप्रेमी व्यक्तीने आयोजित केलेल्या एकदिवसीय साहित्य संमेलनाला उपस्थित होतो. तेथेही एका परिसंवादात अभिव्यक्तीच्या विविध स्वरूपांची मांडणी केली. कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष मोहन पाटील सर यांनी संवादक या भूमिकेतून अभिव्यक्तीचे अनेक पैलू समोर आणले. योगायोगाने त्याच दिवशी क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी होती. महिलांना अभिव्यक्तीचे नव्हे तोंडातून शब्द काढण्याचे, शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळावे म्हणून सावित्रीबाईंनी त्यांच्या काळात किती त्रास सहन केला होता. ही बाई महिलांना शिकवते, त्यांच्यात विचार पेरते म्हणून तत्कालीन समाजाने शेणाचे गोळेही फेकले त्यांच्या अंगावर. महिलांना व्यक्त होण्याची संधी देण्यासाठी त्या खपत होत्या आणि महिलांना परंपरावादी जोखडाशी जुंपणारा तत्कालीन समाज त्यांचा आवाज उमटूच नये म्हणून तुटून पडला होता.

अभिव्यक्ती आणि गळचेपीचा असा हा सनातन संघर्ष आहे. तो सामाजिक अभिसरणातून उमटलाय, साहित्यातून व्यक्त झालाय आणि वर्तमान काळात तर अनेक अंगानी समोर येत असतो. राजकीय प्रचार ही त्याची एक बाजू झाली. तुमचं म्हणणं मांडायला मिळावं, दुसऱ्यांनी ती संधी तुम्हाला द्यावी, तुमचं ऐकून घ्यावं.. शांतपणे हे किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या तोंडावर कुणीतरी हात ठेवल्याशिवाय, तुम्हाला गप्प बसवल्याशिवाय कळत नाही. म्हणजेच एखाद्याला बोलायला मिळावं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अगदी प्राथमिक आविष्कार म्हणू शकतो. मग बोलायला मिळत नाही तेव्हाची कासाविशी, आपलं म्हणणं मांडता येत नाही म्हणून जे काही जाणवतं ती गळचेपी अशी ही प्रक्रिया समजून घ्यावी लागेल.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची फार उच्च मांडणी करायची गरजच नाही. तुमचा आवाज ऐकला जातोय, तुम्हाला गप्प बसवलं जात नाही हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. घटनेने आपल्याला व्यक्त होण्याचा, निर्भयपणे मते मांडण्याचा अधिकार दिलाय.. पण त्याच अधिकारावर अतिक्रमण, तुम्ही बोलू नये म्हणून मुस्कटदाबी, झुंडशाहीचा गलका म्हणजे गळचेपी. निवडणूक प्रचार जेव्हा शिगेला पोहोचेल तेव्हा याचा अक्राळविक्राळ अवतार पाहयला मिळणार आहे. परस्परांच्या नावाने शिमगा तेव्हा रंगणार आहे. आमची ती अभिव्यक्ती आणि तुमची ती बेताल बकबक असा पवित्रा यावेळी सर्वच राजकीय पक्ष घेतील. इतरांची तोंडे बंद करायला धावतील. त्यावेळी अभिव्यक्तीलाही एक सुसंस्कृत मर्यादा असावी हे लक्षात येते.

हिंदीतील प्रख्यात कवी नामवर सिंह यांची आठवण येते. दादरीच्या घटनेनंतर देशभरात पुरस्कार वापसी सुरू झाली होती. त्यांनी पुरस्कार परत करायला नकार दिला होता. का तर अभिव्यक्त स्वातंत्र्याची गळचेपी काय आजचीच नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. पण त्यांच्या या मताचाही आदर केला गेला. कारण दुसऱ्याचे विचारपण ऐकायला हवेत. त्याचेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच की. आपलं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत वाट्टेल ते बोलायचं आणि दुसरा प्रतिवाद करायला लागला की त्याचं तोंड दाबायचं.. हे गेली अनेक वर्षे सुरू आहे.. दुसऱ्याचं म्हणणं ऐकायला आपल्याला वेळ नाही, सवड नाही. धीर नाही. माझंच ऐका असा सारा कल्लोळ. हा गलका आता जवळपास दीड महिना अधिकाधिक कर्कश होत जाणार आहे.

प्रसारमाध्यमांवरही आधीच फास टाकले गेले आहेत. स्वतंत्र दैनिक जगवायचे, वाढवायचे तर अनेक अटीशर्ती. आता परवा राफेल प्रकरणाच्या बातम्या दिल्या म्हणून अटर्नी जनरल म्हणाले आम्ही खटला भरू द हिंदूवर. हा काय प्रकार आहे? पत्रकारांवर, प्रसारमाध्यमांवर इतका उघड दबाव आजवर कुणी आणला नव्हता.. म्हणजे यांची पोलखोल करणारी बातमी दिली की कायद्याचे जंजाळ हे मागे लावणार. पत्रकारांना घाबरवणार.. पत्रकारितेलाही जखडू पाहणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काही एक पडलेले नाही.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content