HomeArchiveहाऊज द "जोश",...

हाऊज द “जोश”, हाय सर!

Details
“हाऊज द “”जोश””, हाय सर!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

डॉ. अनिल पावशेकर
[email protected]

सर सायरील रेडक्लीफ यांनी ऑगस्ट १९४७ ला आखलेल्या रेडक्लीफ रेषेने ४,५०,००० कि.मी. चौरस भुभागाचे आणि ८८ लाख जनसंख्येची ब्रिटिश जोखडातून मुक्ती होऊन भारत आणि पाकिस्तान या दोन देशात विभाजन झाले. फाळणीच्या रक्तरंजित पार्श्वभूमीवर जरी दोन्ही देश वेगवेगळे झाले असले तरी दोन्ही देशांची नाळ अटारी वाघा या सीमेने अजूनही शाबूत आहे. दळणवळण, व्यापार आणि इतर बाबींसाठी रस्तेमार्गाने संपर्क करण्याची दोन्ही देशादरम्यान ही सीमा एकमेव जागा असल्याने अटारी वाघा सीमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचप्रकारे फिरोझपूरजवळ गंडासिंगवाला, हुसैनीवाला सीमा आणि फाझिल्काजवळ महावीर, सद्की सीमा दोन्ही देशाच्या दरम्यान आहे. अमृतसरपासून ३२ कि.मी. तर लाहोरपासून २२ कि.मी. अंतरावर असलेली अटारी वाघा सीमा दोन्ही देशांसाठी जिव्हाळ्याचा विषय असून दोन्ही देशातील नागरिक सूर्यास्ताच्या दोन तास पूर्वी होणाऱ्या बिटींग दी रिट्रीट समारंभाला एकच गर्दी करतात. अटारी सिमेजवळ ऑगस्ट २०१७ला उभारण्यात आलेला ३६० फूट (११० मीटर) उंच गगनचुंबी स्तंभावर भारताचा तिरंगा डौलाने फडकत असतो तर यालाच समांतर वाघा सीमेकडे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून देत असतो.

या सीमेवर १९५९ पासून या निरोप समारंभाला सुरूवात झाली असली तरी भारताकडून सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) स्थापना व्हायच्या आधी पंजाब पोलीस दलातर्फे या समारंभात संचालन केले जात असे. मात्र सीमा सुरक्षा दलाच्या स्थापनेनंतर म्हणजेच १९६५ पासून बीएसएफ तर पाकतर्फे पाकिस्तानी रेंजर्स यात सहभागी होतात.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून ही जागासुद्धा सुटली नाही आणि २ नोव्हेंबर २०११ ला वाघा सीमेकडे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू तर ११० लोक जायबंदी झाले होते. या सीमेवर नेहमीच तणाव असला तरी बकरी ईद, दिवाळी तसेच दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाला दोन्ही बाजूंनी शुभेच्छा आणि मिठाईचे आदानप्रदान होते. अर्थातच वारंवार होणाऱ्या अप्रिय घटनांमुळे यात बरेचदा खंडसुद्धा पडतो. नुकतेच पुलावामा इथे झालेला भ्याड आतंकी हल्ला, प्रत्युत्तरादाखल भारताचा एअर स्ट्राईक आणि विंग कमांडर अभिनंदन यांच्या धाडसी कामगिरीमुळे प्रकाशझोतात आलेल्या अटारी वाघा बॉर्डरला भेट द्यावे असे मनोमन वाटत होते आणि किसी चिजको शिद्दतसे चाहो तो पुरी कायनात उसे मिलानेकी कोशिश करती है याचा अनोखा अनुभव आला.

अमृतसर सोडताच कधी एकदाचे अटारी वाघा सीमेवर पोहोचतो असे झाले होते. शिस्तबद्ध वाहतूक, मार्गावर दिसणारी लष्करी ठाणी, युद्धस्मारके, दृष्टीस पडणारी लष्कराची वाहने, कडक, करारी बाण्याचे आणि देशाच्या संरक्षणार्थ अहोरात्र झटणारे गणवेषातील सैनिक पाहून मन देशप्रेमाने उचंबळून येत होते. संपूर्ण देशातील विविध जातपात आणि धर्माचे नागरिक हातात तिरंगा, गालावर तिरंग्याचे चिन्ह आणि ओसंडून वाहणाऱ्या अलोट उत्साहाने सीमेकडे कूच करत होते. अखेर आकाशी डौलाने झळाळणारा तिरंगा दिसताच भारत माता की जय, हिंदुस्थान झिंदाबाद आणि वंदे मातरमच्या गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.

सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक तपासणी करून ओळखपत्र असेल तरच स्टेडियमवर प्रवेश दिला जातो. प्रवेशाकरीता व्हीआयपी पासेससुद्धा असतात. मात्र त्याकरिता एक दिवसआधी बुकिंग करावे लागते. आत पोहोचताच आपले स्वागत होते, ये शान तिरंगा है, ये जान तिरंगा है, भगवान तिरंगा है, अभिमान तिरंगा है, बलिदान तिरंगा है या गिताने. बस एवढेसे गीत तुमच्या धमन्यात रक्त सळसळवायला पुरेसे असते. पुढील दोन तास तुमची वैयक्तिक ओळख गळून पडते आणि तुम्ही उरता ते ते केवळ अस्सल भारतीय. आपल्या बाजूने सीमा सुरक्षा दलातर्फे उद्घोषक कार्यक्रमाचे सुरळीतपणे संचालन करत प्रेक्षकांचा उत्साह वाढवत असतो आणि समयोचित मार्गदर्शन पण सुरू असते. पाकिस्तानी बाजूने मदारीचा खेळ चालू असल्यासारखे प्रेक्षकांकरीता ढोल वाजवले जातात. परंतु त्याला आपल्याकडील ओसंडून वाहणाऱ्या झंझावताची सर नसते. सतत गुंजणारी देशभक्तीपर गिते, बीएसएफच्या जवानांचा जोशपूर्ण राबता, उद्घोषकाची आवेशपूर्ण ललकारी आपल्याला बेभान करते.

दरम्यान स्टेडियमच्या परेड भागात आपल्याकडे नारी सन्मानार्थ प्रेक्षकांतील बालिका, स्त्रियांना मर्यादित रेषेपर्यंत हातात तिरंगा घेऊन फेरी मारण्याची मुभा दिली जाते. आमच्या सहकारी डॉ. गीता वर्मा आणि डॉ. पल्लवी माने यांना हा सम्मान मिळाला. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानी बाजूने नागरिकांना ही सुविधा नव्हती. केवळ कागदी झेंडे हालवण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. खरोखरच इथले सळसळते वातावरण पाहता आपण या देशात जन्म घेतला याचा सार्थ अभिमान आणि परम आनंद होतो. दरम्यान ये देश है वीर जवानोंका…हे गीत सुरू होताच आबालवृद्ध हर्षोल्हासाने नाचू लागतात आणि एड्रीनॅलीन रश काय असते याची स्वानुभूती होते. या सर्व धावपळीत वाघा बाजूने पाकिस्तानी रेंजर्सची जमवाजमव सुरू होते. मात्र आपल्याकडील सोहळा आनंदात सुरू असतो. सीमा सुरक्षा दलाचे जवान कडक शिस्तीने, कणखरपणे लष्करी पोषाखात वावरत असतात तर पाक रेंजर्स दरबान, चौकीदारसारखे परिधान करून असतात. पाक बाजूने सीमेवर पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांची तसबीर लागलेली असते. पाक ध्वजासोबतच भगवे, निळे, हिरवे, अनेकरंगी ध्वज सोबत फडकत असतात. ये देश है वीर जवानोंका, अलबेलोंका,,, हे गीत कानावर पडताच एक श्वास, एक ध्यास घेतलेल्या देशप्रेमी जनतेच्या उत्साहाला आणखी उधाण येते. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा या गितावर जवळजवळ १५ मिनिटे स्टेडियमच्या परेड भागात बालिका, स्त्रिया राष्ट्रसंगीत उत्सवात न्हाऊन निघतात. एक मोठ्या एलईडी पडद्यावर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सुरू असते. या सोहळ्यात खरा रंग भरला जातो तो सुनो गौरसे दुनियावालो, बुरी नजर ना हमपे डालो, सबके आगे होंगे हिंदुस्थानी या गिताने. उद्घोषकांतर्फे खड्या आवाजात भारत माता की जय, हिंदुस्थान झिंदाबाद, वंदे मातरमचा जयघोष होताच उपस्थित जनसागरात राष्ट्रचैतन्याची त्सुनामी उसळते.

बरोबर ४.४५ वाजता सीमा सुरक्षा दलातर्फे त्यांची स्थापना, दैदिप्यमान इतिहास, गौरवगाथा याची संक्षिप्त माहिती दिली जाते. याची सुरूवात बीएसएफच्या हम सीमा के पहरी है या गिताने होते. राजस्थानचे वाळवंट असो की काश्मीरचे बर्फाळ वातावरण असो, दलदल असो की उंच शिखरे, देशाची सुरक्षा आपले रक्त शिंपडत अहर्निशपणे सीमा सुरक्षा दलाचे जवान डोळ्यात तेल घालून करत असतात.

जवळपास साठ वर्षे झालेल्या या निरोप समारंभाच्या सुरूवातीला स्वर्णजयंती द्वाराच्या गॅलरीतून सुरूवात होते. १३ जवानांच्या या तुकडीतून समारंभाचे संचालन होते. रणदंदुभीचा स्वर कानी पडताच प्रत्यक्ष युद्धाचा आभास होतो. आरंभी दोन ब्लॅक कमांडो यंत्रवत संचालन करत थेट सीमेवर जातात. पाठोपाठ जर्मन शेफर्ड आणि लॅब्राडॉर जातीचे दोन श्वान जवानांसोबत ऐटीत गस्त घालतात. यानंतर दोन महिला सैनिकांच्या नेतृत्त्वात जवानांची तुकडी गॅलरीतून खाली उतरते. यावेळी भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंनी दोन स्त्रीसैनिक दिमाखात संचालन करत पोस्टपर्यंत येतात. पाठोपाठ आठ सैनिक शिस्तबद्ध संचालन करत येतात आणि एकमेकांना सामोरे आल्यावर जोर आजमवतात. बाहुंचा दम, आवळलेल्या मुठी, गर्वाने छाती ताठ करून, करारी मुद्रा, भेदक डोळे, नजरेत अंगार वातावरण आणखी तापवतात.

फाटक उघडताच दोन्ही बाजूंनी हस्तांदोलन होताच पुन्हा एकदा मनगटाची ताकद दाखवली जाते. भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद, वंदे मारतम च्या घणाघाती घोषणांनी वातावरण ढवळून निघते. जवानांचे मिशांवर ताव मारणे, भक्कम खांदे उंचावत समोरासमोर आव्हान देणे यामुळे आपण प्रत्यक्षात युद्धभूमीवर असल्याची भावना मनात येते. यानंतर दोन्ही देशांचे ध्वज उतरवणे सुरू होते. अत्यंत लगबगीने परंतु काळजीपूर्वक ही प्रक्रिया पार पाडली जाते. एकवेळ अशी येते की हे दोन्ही राष्ट्रांचे ध्वज एकमेकांची गळाभेट घेत असल्याचे दृश्य दिसते, मात्र हा आभास असतो. नियतीला जागून हे दोन्ही ध्वज सन्मानाने खाली येताच व्यवस्थित घडी करून जवानांच्या खड्या पहाऱ्यात परत आणले जातात. दोन्ही बाजूंनी एकमेकांना निरोप दिला जातो आणि हा कार्यक्रम विसर्जित झाल्याची घोषणा केली जाते.

अत्यंत भावनिक आंदोलन घेत जवळपास दोन तास चाललेला हा समारंभ डोळ्याचे पारणे फेडून जातो. समारंभाची सांगता झाली तरीही पाय जागेवरून हलायला तयार नसतात. नजर हटत नाही. खालीवर झालेला श्वास लवकर सामान्य होत नाही. याची देही याची डोळा हा समारंभ पाहताना ध्यान हरपून जाते. स्टेडियम सोडून जाताना जिवलगाची ताटातूट झाल्याची तरंगे मनात उठतात. उर अभिमानाने भरून येतो. अत्यंत हळव्या मनाने देश, जवानांना सलाम करत जड पावलाने अखेर निरोप घेतल्या जातो. अत्यंत भारावलेल्या या समारंभाची सांगता झाली असली तरी कोणीही विचारले की हाउझ द जोश, तर उत्तर एकच मिळते हाय सर!..”
 
“डॉ. अनिल पावशेकर

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content