HomeArchiveपद्मभूषण पं. डॉ....

पद्मभूषण पं. डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन

Details
पद्मभूषण पं. डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
डॉ. वसंतराव देशपांडे संगीत सभेचे प्रमुख विश्वस्त पं. चंद्रकांत लिमये व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केन्द्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ मे २०१९ रोजी वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवच्या शुभारंभाचा सोहळा मुंबईत रविंद्र नाट्य मंदीर येथे संध्याकाळी ५ ते रात्रौ १० या वेळेत आयोजित केला आहे.

यावेळी ‘वसंत बहार’ हा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. दृकश्राव्य माध्यमातून उलगडणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदीशी, ठुमरी, नाट्यगीत, चित्रपटगीत, इत्यादी गीतप्रकार पं. चंद्रकांत लिमये आपल्या गुरूकुलातील शिष्यांसह सादर करणार आहेत. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या तरूण गायिका नुपूर काशीद-गाडगीळ व पद्मभूषण पं. प्रभा अत्रे यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम जन्मशताब्दीनिमित्त सर्व रसिकांसाठी विनामूल्य ठेवला आहे.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महान गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते, ज्यांनी आपल्या अद्वितीय, अविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेते डॉ. वसंतराव देशपांडे. ज्यांनी शास्त्रीय संगीत, ठुमरी, नाट्यसंगीत, चित्रपट संगीत या सर्व गान प्रकारांवर आपल्या गायकीचा अमीट ठसा उमटवला, असे आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर, बेळगाव, गोवा इत्यादी ठिकाणी संस्थेच्या वतीने वर्षभर महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त “नक्षत्र वसंत” ही विशेष स्मरणिकाही महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात प्रकाशित केली जाणार आहे.

यावेळी माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी, पं. शंकर अभ्यंकर, पं. सत्यशील देशपांडे, फैयाज, अच्युत गोडबोले, माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून ते डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी जागृत करणार आहेत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...
Skip to content