HomeArchiveविष्णू नावाचा मित्र..

विष्णू नावाचा मित्र..

Details
विष्णू नावाचा मित्र..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

भगवान निळे
[email protected]
काही माणसं तुम्हाला आयुष्यात खूप उशिरा भेटतात आणि लवकरच निघूनही जातात. पण या अल्पावधीच्या सहवासात तुम्ही त्या व्यक्तीच्या इतके प्रेमात पडता की पूर्वाश्रमीची नाळ तर उभयतांमध्ये जोडली गेलेली नव्हती ना, अशी रास्त शंका घर करू लागते. मग ती व्यक्ती अल्पावधीतच सर्वांना पोरके करून जाते. ती सल कायमची तुमच्या मनात सलत असते.

कवी विष्णू सूर्या वाघ असाच माझ्या आयुष्यात आला अन कायमचा निघूनही गेला. विष्णूच्या जाण्याची सल जशी मला बोचत आहे तशीच आणखी एका सलीने माझी पाठ काही सोडलेली नाही. मी कविता लिहायला सुरूवात करून दोन-तीन वर्षेच उलटली होती. कुठे कुठे माझ्या कविता छापून यायला सुरूवात झाली होती. माझ्या कविता वाचून कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांनी माझ्या मित्रांकडे “कोण हा भगवान निळे? मला त्याला भेटायचे आहे” अशी विचारणा केली. तब्बल तीन निरोप विंदांनी मला धाडले. पण मुळात माझ्या आळशी प्रवृत्तीमुळे भेटू निवांत.. असा स्वतःशीच बावळट विचार करून विंदांना भेटण्याचा मुहूर्त मी पुढेपुढे ढकलत होतो. .. आणि एके दिवशी विंदा गेल्याची बातमी आली.

माझ्या एका पत्रकार व कवी असलेल्या सहकारी मित्राने मला खूप दूषणे दिली. विंदा जाण्याच्या आधी आणि गेल्यानंतरही त्यांनी वर्तमानपत्रातील त्यांच्या लेखातून आणि पुस्तकातून माझा मूर्खपणा जगजाहीर केला. दुःख त्यांच्या लिखाणाचे नव्हते तर विंदांना प्रत्यक्ष भेटलो नाही याची सल होती आणि ती कायम राहणार. किंबहुना थोड्याफार फरकाने हीच सल विष्णूच्या जाण्याने काळजात आहे. का आम्ही खूप आधी प्रत्यक्ष भेटलो नाही? नंतर भेटलो तर तो का इतक्या लवकर मैफलीतून कायमचा निघून गेला?

विष्णू मला आणि मी त्याला फार पूर्वीपासून कवितेतून भेटत होतो. आम्हा दोघांची अक्षरओळख पूर्वीच झालेली होती. प्रत्यक्ष भेटीचा योग मात्र गोव्यातील “काव्यहोत्र” कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. 38 वर्षे कविता लिहिल्यानंतर 2015 साली माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. “काव्यहोत्र” च्या आयोजनात भगवानचाही सहभाग असू द्या अशी इच्छा विष्णूने व्यक्त केली होती. अरूण म्हात्रे, नरेंद्र गावकर, भालचंद्र कुबल या विष्णूच्या मित्रांनी मला नियोजनात माझी जी काही मदत होईल ती माझ्याकडून करवून घेतली.

खरे तर विष्णू त्यावेळी भारतीय जनता पार्टीत होता. मी वैचारिकदृष्ट्या डावा. डाव्या-उजव्यांचे विळा-भोपळ्याचे वैर. माझ्या डाव्या विचारसरणीच्या अनेक मित्रांनी मी “काव्यहोत्र”ला जाऊ नये म्हणून त्यांच्या परीने प्रयत्न केले. मात्र हा भाजपाचा कार्यक्रम नसून गोवा कला अकादमीचा कार्यक्रम आहे आणि विष्णू हा अकादमीचा अध्यक्ष आणि माझा कविमित्र आहे असे सांगून मी, संभाजी भगत, प्रेमानंद गज्वी असे “पुरोगामी” मित्र “काव्यहोत्र”ला गेलो. माझे तर म्हणणे असे होते की, समजा आयोजक भाजपा किंवा रा.स्व. संघाचे जरी असले तरी तेथे तुम्ही तुमच्याच विचारसरणीच्या कविता सादर करणार. तुमचे विचार त्यांच्याच व्यासपीठावर मांडले तर बिघडले कुठे? आपल्याच गोतावळ्यात आपले विचार मांडणे मला शहाणपणाचे वाटत नाही.

असो. त्यानंतर फेसबुक आणि व्हाट्स अप तसेच चौकसभा घेऊन मी, संभाजी, प्रेमानंद, अरूण यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर अपप्रचार करण्यात आला. आम्ही मात्र त्याला भीक घातली नाही. मी दुसऱ्या वर्षीही “काव्यहोत्र”ला गेलो होतो.

माझा कवीमित्र व गीतकार विष्णू थोरे हाही गोव्याला आला होता. मात्र नियमानुसार त्याने नोंदणी केलेली नव्हती. त्यामुळे त्याचे नावच नव्हते. त्याने बरेच प्रयत्न केले. पण, आयोजक नियमावर बोट ठेवत होते. तो मला म्हणाला, बघ काही करता येते का? मी विष्णू वाघशी बोललो आणि त्याला अडचण सांगितली. विष्णूने क्षणाचाही विलंब न लावता त्याचे नाव नोंदवून घ्यायला आयोजकांना भाग पाडले. विष्णू थोरे म्हणजे आपल्या “काव्यचावडी”चा सदस्य ना? इतकीच या विष्णूने त्या विष्णूसंदर्भात चौकशी केली होती.

“काव्यहोत्र”च्या अखंड काव्यवाचनाचा कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी मुंबईसाठीच्या गाड्या निघाल्या. मीही आवराआवर करून निघण्याच्या बेतात असतानाच विष्णू माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “तू थांब. तू उद्या जा. मला रात्रभर तुझ्या कविता ऐकायच्या आहेत. मी उद्या तुझी विमानाने जाण्याची व्यवस्था करतो.” काय करणार? मी थांबलो. विमानप्रवास काही मला नवा नव्हता. तरीही विष्णू आणि कवितांसाठी मी थांबलो. रात्रभर मी त्याला माझ्या कविता ऐकविल्या अन त्याने त्याच्या.

विष्णूसोबतची ती अविस्मरणीय मैफिल माझ्या कायम स्मरणात राहील. अशा आणखी मैफिली रंगल्या असत्या. पण विष्णू आयुष्याची मैफिल अर्धवट सोडून कायमचा निघून गेला. ही सल कायम आता सतावत राहणार. ही अर्धवट राहिलेली मैफिल पुन्हा रंगणार जेव्हा मी या भौतिक जगातून कायमचा निघून जाणार.”
 
“भगवान निळे

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content