Details
केएचएल न्यूज ब्युरो
“ऑनलाईन शॉपिंगवर सरकारने विविध नियम व अटी घातल्यामुळे आता ग्राहकांचा खरेदीसाठी किरकोळ विक्री दालनांकडे कल वाढताना दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेत झुडिओने तयार कापड नाममूद्राअंतर्गत मुंबई उपनगरसह ठाणे जिल्ह्यात विस्तार केला आहे. वसई, नालासोपारा, भिवंडीनंतर ठाणे शहरात दुसरे तर भारतातील ८१वे दालन सुरू केले आहे.”
“पार्श्वभूमीवर टाटाच्याप अधिपत्याईखालील ट्रेण्टा लिमिटेड या भारताच्याझ सर्वात मोठ्या व जलदगतीने विकसित होत असलेल्या झुडियो या कपड्यांच्या किरकोळ विक्रीचे हे दालन ठाणे येथे प्रभात प्लाझा येथे आहे. ठाणे शहरातील इतर भागातही वाढती लोकसंख्या व पसंती लक्षात घेता याठिकाणी हे नवे दालन सुरू करण्यात आले असून याठिकाणी आकर्षक दरांमध्येत फॅशनेबल पोशाख मिळतात. पुरूषांचे पोशाख, महिलांचे पोशाख, पारंपारिक पोशाख, लहान मुलांचे पोशाख, फूटवेअर व अॅक्सेसरीजचे फॅशन कलेक्शन्स याठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.”