Details
“केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये खाजगी व अफोर्डेबल इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी तंत्रज्ञान आणणे आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कठीण काळातदेखील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत राहवे यासाठी या शाळांच्या प्रयत्नांमध्ये लीड स्कूलने (LEAD School) मदतीचा हात पुढे केला आहे. भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन शाळा असलेल्या व ‘लीड स्कूल@होम प्रोग्राम’ (LEAD School@Home program) चालवणाऱ्या लीड स्कूलने देशभरातील कमी खर्चात चालवल्या जात असलेल्या २०० खाजगी शाळांना मोफत लायसन्सेस देण्याची घोषणा केली आहे.
“”सेव्ह अवर स्कूल्स”” या उपक्रमांतर्गत लीड स्कूल@होम हा ऑनलाईन प्रोग्राम, पात्र ठरणाऱ्या शाळांना प्रत्यक्ष वर्ग सुरू होईपर्यंत मोफत पुरवला जाणार आहे. हा ऑनलाईन प्रोग्राम चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सोयीसुविधा तसेच यासाठी शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षणदेखील पात्र ठरणाऱ्या शाळांना पुरवले जाईल. या शाळा सीबीएसई किंवा राज्य शिक्षण मंडळांशी संलग्न असू शकतात.
कमी खर्चात चालवल्या जाणाऱ्या खाजगी शाळांची वार्षिक फी १८,००० ते ५०,००० रूपयांपर्यंत असते. कर्मचाऱ्यांचे पगार, वर्गातील बाकांपासून ते मुलांच्या दळणवळणापर्यंत शाळेतील विविध पायाभूत सोयीसुविधा अशा सर्वच बाबतीत काटकसरीने चालवल्या जाणाऱ्या या शाळा, ‘माफक फी’ किंवा ‘फी माफ’ अशा परिस्थितीमध्ये आपले अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी झगडत आहेत.
लीड स्कूलचे सहसंस्थापक व सीईओ सुमित मेहता यांनी सांगितले की, “”जगभरात पसरलेल्या आजाराच्या साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी शाळा जुळवून घेत असताना आपल्या मुलांचा अभ्यासाचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. दर महिन्याला होत असलेल्या अभ्यासाच्या नुकसानामुळे मुलांचा अभ्यास कित्येक महिने मागे पडत चालला आहे. आपल्या देशातील शाळांना मदत म्हणून आम्ही उच्च दर्जाचे ऑनलाईन शिक्षण पुरवणार आहोत. विद्यार्थी आपल्या घरी सुरक्षित राहून हे शिक्षण घेऊ शकतात. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी हे शिक्षण व्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत आणि आमचा हा उपक्रम म्हणजे या व्यवस्थेला मदत म्हणून एक छोटेसे योगदान आहे.””
प्रत्येक राज्यात फक्त मर्यादित लायसन्सेस आहेत. वेबसाईटवर उपलब्ध करवून देण्यात आलेला फॉर्म (form) भरून शाळांना यासाठी अर्ज करता येईल. या अर्जामध्ये विद्यार्थ्यांची संख्या, संलग्न बोर्ड, फी श्रेणी, सध्याच्या शैक्षणिक सुविधा इत्यादी माहिती द्यावयाची आहे. आवश्यक सर्व माहिती मिळाल्यानंतर लीड स्कूल सर्व प्रवेशिका पडताळेल व शिष्यवृत्तीसाठी कोणत्या शाळांना पात्र ठरवायचे याचा निर्णय घेईल.
“