Homeकल्चर +अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी...

अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी सोडवणार ‘केस नंबर ००२’!

स्टोरीटेलवर दिग्गज साहित्यिकांसोबतच नव्या दमाच्या प्रतिभावंतांनाही विशेष स्थान दिले जात आहे. लेखिका सायली केदार यांच्या केस नंबर ००१च्या पहिल्या सिझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर या मालिकेचा दुसरा सिझन प्रख्यात अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या आवाजात स्टोरीटेल मराठीवर प्रदर्शित होत आहे.

‘केस नंबर ००२’विषयी सायली केदार सांगतात, “केस नंबरचा पहिला सिझन लिहिताना त्यावर मी आणि माझ्या पब्लिशर सई तांबेंनी बरंच काम केलं होतं. श्रोत्यांना कसं खिळवून ठेवता येईल हे प्रत्येक एपिसोडमध्ये काटेकोरपणे बघत होतो. सिरीज रिलीज झाली तेव्हा आम्ही केलेल्या कामाबद्दल समाधानी होतो. पण कसा response येईल याबद्दल खूप उत्सुकता होती. मात्र, सिरीज भरपूर तास ऐकली गेली आणि commentsचा, मेसेजेचा आणि emailsचा पाऊस पडला. लोकांना ती गोष्ट खूपच आवडली आणि ती अगदी अनपेक्षितपणे बराच काळ best sellersमध्ये झळकली.

अर्थातच दुसरा सिझन लिहीताना माझ्या स्वतःकडून आणि लोकांच्या या सिरीजकडून, त्या पात्रांकडून बऱ्याच अपेक्षा होत्या आणि आहेत. मुख्य पात्र इन्सपेक्टर निरंजन प्रभू हेच असल्याने आणि त्याची तपासाची, कामाची पद्धत तीच असल्यानी थोडा nostalgiaसुद्धा सिझन २मध्ये आहे. स्टोरीटेलच्या टीमबरोबर काम करणं ही खूपच enjoyable गोष्ट. आम्हाला काम करताना जशी मजा आली तशीच श्रोत्यांनाही ऐकताना मजा यावी, येईल.”

गीतांजली कुलकर्णी यांनी या सिरीजला आवाज दिला आहे. त्यांच्या या अनुभवाबद्दल त्या म्हणाल्या की, ‘केस नंबर ००२’चा अनुभव यासाठी चांगला होता कारण की, सई आणि सायली दोघीही खूप मन लावून काम करतात. आम्ही एकत्र मिळून खूप चर्चा केल्या. त्या खूप इनपुट्स देतात. त्यामुळे असं नाही वाटत की तिथे आपण फक्त आहोत. आपल्याला मदत करायला खूप लोकं असतात. आणि छोट्याछोट्या गोष्टींकडेसुद्धा लक्ष देतात. हे पात्र तसंच साउंड नाही ना होत आहे, वेगळं वाटतंय ना? तर त्यामुळे काम करताना जे सुरुवातीला अस्पेशिअली गरज असते.

आपल्याला एक्झॅक्टली पात्राचा आवाज, त्याच्या टेम्प्रामेंटप्रमाणे त्याचं बोलणं ठरवायचं असतं. तेव्हा खूप मदत झाली सई आणि सायलीची. आणि नंतर अर्थातच तुम्हाला अंदाज येतो आणि मग तुम्ही फाईंडआऊट करता की कसं असेल हे पात्र आणि तुम्ही करत जाता. हे एक टीमवर्क आहे. केस नंबर ००२मधील थरार, भीती, प्रेम प्रसंग, असे अनेक प्रसंग आणि त्यातील भाव रेकॉर्ड करताना मला फार मजा आली. ऑडिओबुक रेकॉर्डिंगची प्रोसेसच मला मेडिटेटिंग वाटते.

‘केस नंबर ००२’ या सीरिजमध्ये निरंजन प्रभू हा एक साधा अप्पर मिडलक्लास, सर्वसामान्य माणूस. अर्थार्जन आणि आवड यासाठी प्रत्येकच माणूस काही न काही काम करत असतो. तसंच निरंजन त्याच्या पॅशनसाठी पोलीस खात्यात आला. वर्दी म्हणजे कणखर आणि तटस्थ असा ग्रह आणि अपेक्षा असली तरीही माणूस म्हटलं की emotions आले, family आली. दोन्ही बाजू सांभाळणं आलं. पण घरच्या जबाबदाऱ्यांना ओझं न मानता त्यांचा केस समजून घेण्यासाठी उपयोग करणाऱ्या निरंजनकडे एका रात्री एक माणूस बायकोची मिसिंग कंप्लेंट घेऊन येतो.

बायको गायब होऊन काहीच तास व्हायच्या आत. तिची वाट बघण्याआधी याला ती गायब झाल्याची खात्री आहे. निरंजन त्या सणकी नवऱ्याची केस घेतो आणि त्याच्या बायकोचा, अपर्णाचा मृत्यू होतो. या केस नं ००२चा तपास करताना निरंजनला नेमकं कोणतं सत्य कळतं? एकामागून एक संशयित आणि साक्षीदार संपत जाताना ही केस सोडविण्यात निरंजन यशस्वी होतो का? पहिल्याच केसच्या यशानंतर वाढलेल्या अपेक्षा पुऱ्या करताना निरंजनची होणारी तारेवरची कसरत आणि गुन्हेगाराची हाताबाहेरची सूडवृत्ती दाखवणारी ही रहस्यमय ‘केस नंबर ००२’ अनेक गुपितांसोबत रसिकांची उत्कंठा ताणत त्यांना सहज गुंतवून सोडते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content