Homeमुंबई स्पेशलमुंबईकरांनो.. जाणून घ्या...

मुंबईकरांनो.. जाणून घ्या तुमच्या पोस्टमनविषयी!

मुंबई टपाल विभागाकडून आज “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” (Know your Postman) या मोबाईल अॅपचा आरंभ करण्यात आला. पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. त्यांच्याच संकल्पनेतून या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

मुंबई टपाल विभागाने तयार केलेल्या या अनोख्या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या क्षेत्रातील पोस्टमनविषयी तपशील उपलब्ध होणार आहे. क्षेत्राचे नाव, टपाल कार्यालयाचे नाव आणि पिनकोडच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरांतील 86,000पेक्षा अधिक क्षेत्रांची माहिती या अॅपवर उपलब्ध आहे. मोबाईल अॅप https://cutt.ly/kypmr या लिंकच्या माध्यमातून गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. जर एखादा पत्ता यावर उपलब्ध झाला नाही तर तो पत्ता तत्काळ टपाल खात्याला कळवून 24 तासाच्या आत अद्ययावत केला जाईल.

मुंबई शहरात 89 टपाल कार्यालये आहेत, ज्यात 2000 पोस्टमन (महिला आणि पुरुष) यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहे. मुंबई शहरात दररोज सुमारे 2 ते 2.5 लाख टपालसाहित्य,  ज्यात स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, आधार कार्ड, पासपोर्टचे वितरण केले जाते.

टपाल खात्याच्या डिजीटलीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत मुंबई टपाल विभागाने “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” ही सुविधा सुरू केली आहे. यात पोस्टमन तपशील, संपर्क क्रमांक, संबंधित टपाल कार्यालयाचा तपशील आणि संपर्क क्रमांक व पत्ता उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांना टपाल व्यवहार करणे सुलभ होणार आहे. नागरिकांना पोस्टमनशी संपर्क साधून आपल्या उपलब्धतेनुसार त्यांच्याकडून टपालसाहित्य घेता येईल. नागरिकांच्या दृष्टीने हाताळण्यासाठी अतिशय सुलभ असे हे अॅप निर्माण करण्यात आले आहे, असे पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे यावेळी म्हणाल्या.

टपाल खात्याकडून गेल्या तीन महिन्यांपासून पोस्टमनना याचे नियमितपणे कौशल्य आणि संवाद प्रशिक्षण दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content