Homeकल्चर +बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज आदिश स्वीकारणार पॉवर कार्ड!

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल एक सदस्य घराबाहेर पडला तर एका नवा सदस्याची एंट्री झाली. काल अक्षय वाघमारेला घराबाहेर पडावं लागलं. बिग बॉसमध्ये काल झाली सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री. आदिश वैद्यचा काल धम्माकेदार performance झाला. आज आदिश घरामध्ये जाणार आहे. पण, त्याआधीच बिग बॉस त्याला एक कठीण असे कार्य सोपवणार आहे.

बिग बॉस आदिशला बहुमूल्य  temptation स्वीकारण्याची सुवर्णसंधी देणार आहे आणि ते temptation आहे पॉवर कार्ड. या पॉवरद्वारे घरातील कोणता सदस्य कोणते काम करणार याची विभागणी करण्याचा अधिकार आदिशकडे असणार आहे. त्यामुळे दिवसभरातील कारभारावर आदिशचं वर्चस्व असेल. पण आता हे temptation स्वीकारल्यास या पॉवर कार्डची किंमत घरातील सदस्यांना मोजावी लागणार आहे.

आदिश पॉवर कार्डचा स्वीकार करणार आहे. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे. म्हणजे त्याचा खेळ घरात जाण्याअगोदरच सुरू होणार आहे. पॉवर कार्ड मिळविण्याची संधी त्याने स्वीकारलीही आहे. पण त्याच्या बदल्यात घरातील कोणत्याही तीन सदस्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. ती म्हणजे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे. आदिशने कुठल्या तीन सदस्यांची यासाठी निवड केली ते आज कळेलच. पण त्यावरून स्नेहा वाघ त्याला टोमणे मारताना दिसणार आहे.

स्नेहा आदिशला म्हणते, “आल्या आल्या त्रास दिला तुम्ही सगळ्यांना. जसं की आमची तीन लोकं जखमी केली. त्यावर आदिश म्हणतो “कुठले तरी तीन होणारच होते. जर तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असतं? स्नेहा म्हणाली “माझी पद्धत वेगळी असती. मी वेगळ्या पद्धतीने डील केलं असतं. म्हणजे माझ्या पद्धतीने मी डील केलं असतं. नॉट नेसेसरी की आपल्या कोणत्या गोष्टीने समोरच्याला त्रास झालाच पाहिजे, त्याचा त्रास कमी करूनही गोष्टी करू शकतो.

आदिश म्हणतो, “ त्यादृष्टीने मी पूर्ण प्रयत्न केला आहे”. बघूया पुढे अजून काय काय घडतं? कोणकोणत्या गोष्टी खटकतात? तेव्हा बघा बिग बॉस मराठी, आज रात्री, कलर्स मराठीवर..

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content