Homeकल्चर +बिग बॉसमध्ये कोण...

बिग बॉसमध्ये कोण होणार पुढच्या आठवड्याचा कॅप्टन?

बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेले “जिंकू किंवा लढू” हे साप्ताहिक कार्य काल संपलं. या साप्ताहिक कार्यात टीम ए विजयी ठरली. नियमांनुसार या विजेत्या टीमच्या सदस्यांना आठवड्यातील कॅप्टनपदाची उमेदवारी मिळणार आहे. बिग बॉसने सांगितलेच आहे की, या टीममधल्या सदस्यांनी विचारविनिमय करून दोन सदस्यांची नावे कॅप्टन्सीसाठी द्यावी.

बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टनशीपसोबतच खूप मोठी जबाबदारीही येते. आता कॅप्टन बनण्याचा बहुमान कोणाला मिळणार हे आज कळेलच. टीम एमधील सदस्यांनी या विषयावर चर्चा करण्यास काल सुरूवात केली. प्रत्येक सदस्य आपण कॅप्टनसीसाठी कसे योग्य आहोत आणि इच्छा आहे त्यांनाच उमेदवारी मिळावी हे स्पष्ट करू लागले.

जयचे म्हणणे होते मला उमेदवारी मिळाली पाहिजे. मीराने सांगितले, मी माझंच नावं पुढे करेन. विशालचे म्हणणे होते, कॅप्टन म्हणून मला निवडावं अशी विनंती आहे. पण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसने जाहीर केले आहे की टीम ए एकमताने निर्णय घेण्यास असमर्थ ठरली आहे. त्यामुळे आता ही संधी टीम बीला मिळत आहे. टीम बीला ही सुवर्णसंधीच मिळाली आहे. आता टीम बी या संधीचा कसा योग्यपणे वापर करेल? कोणत्या दोन सदस्यांची नावे पुढे येतील? कोण होईल पुढच्या आठवड्याचा कॅप्टन? हे बघूया आजच्या भागात.

बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार आहे “डान्स पे चान्स”, हे कॅप्टन्सी कार्य. पुढील आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन कोण बनणार हे आजच्या भागात कळणार आहे. सदस्यांनी या कार्यासाठी एकसे बढकर एक.. असे गेटअप केले आहेत. सुरेखा कुडची – अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादूस) – आविष्कार दारव्हेकर, मीनल शाह – गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे – सोनाली पाटील, मीरा जगन्नाथ – तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ – विकास पाटील या जोड्या असणार आहेत.

आता यांनी कोणत्या गाण्यांवर डान्स केला, कोण बनला घराचा नवा कॅप्टन, कळणार आहे आज. दादुस आणि आविष्कार यांनी पार्टनर चित्रपटातल्या गाण्यावर धम्माल डान्स केला. आविष्कार आणि दादूस बनले बिग बॉस मराठीच्या घरातले सलमान खान आणि गोविंदा. घरातील सदस्यांनी अजून काय काय धम्माल केली ती आज कळेलच.

याचसोबत टीम एमधील सदस्यांची चर्चा बघायला मिळणार आहे, कॅप्टन्सी टास्कसाठीच्या उमेदवारीसाठी. ज्यामध्ये जय त्याचा मुद्दा मांडताना दिसणार आहे, “आपण जर असे वाद करणार असू तर आपण जे आता म्हणतो आहे की, मी समजूतदार.. वैगरे तर आपण बाहेरच्या सहा जणांना कसे सांभाळणार?”

तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी.. आज रात्री कलर्स मराठीवर..

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content