Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिकेच्या दिमतीला...

मुंबई महापालिकेच्या दिमतीला ५ नवउद्यमी!

मधुमेहपूर्व टप्प्यात चाचणी व मधुमेह प्रतिबंध करुन पाय विच्छेदन टाळू शकणारे उपकरण, ब्लूटूथ तंत्रज्ञान आधारित स्टेथोस्कोप, प्रगत कृत्रिम हात यासारख्या आरोग्य सुविधांचा समावेश असणाऱ्या सेवा देणाऱ्या पाच नवउद्यमींची पहिली तुकडी मुंबई महापालिकेसाठी
आता सज्ज झाली आहे.

आधुनिक नागरी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन तसेच नाविण्यपूर्ण संशोधन करुन नागरिकांना उपयुक्त अशा वस्तू, उपकरणे आणि तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणणाऱ्या नवउद्योजकांना (Startups) प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिकेने “सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एन्टरप्रेनरशिप (स्माईल) कॉन्सिल” बिझनेस इनक्युबेशन सेंटर ही सुविधा सुरू केली आहे. या केंद्राच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात आलेली ५ नवउद्यमींची पहिली तुकडी पालिकेच्या विभागांसोबत मिळून कामकाज करण्यास सज्ज झाली आहे.

स्माईल सेंटरच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या नवउद्योजकांना त्यांचे तंत्रज्ञान, वस्तू, उपकरण इत्यादी महापालिकेच्या संबंधित खात्यांमध्ये उपयोगात आणण्याची संधी प्रदान केली जाणार आहे. अशा प्रकारचे प्रोत्साहन दिल्याने या नवउद्योजकांना त्यांच्या उद्योग वाढीसाठी प्रोत्साहन मिळेल. या उद्देशानुसार नवउद्यमींची पहिली तुकडी निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये ५ नवउद्यमींचा समावेश आहे.

प्रायोगिक तत्त्वावर ते संबंधित वस्तू, उपकरण, तंत्रज्ञान उपयोगात आणणार आहेत. आय.आय.टी. मुंबई अंतर्गत साइन बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या संयुक्त विद्यमानाने पालिकेच्या स्माईल कौन्सिलने आपल्या पहिल्या तुकडीमध्ये या सर्व उद्योजकांचा समावेश केला आहे. त्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

हेस्टॅक ऍनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड: सदर स्टार्ट-अप संसर्गजन्य रोगांसाठी गुणसुत्रीय (जीनोमिक) विश्लेषणावर काम करत आहे. यामुळे आरोग्यसेवांचे निर्णय अधिक चोखपणे घेता येतील. सध्या पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील आण्विक प्रयोगशाळेत कोविड १९ विषाणूच्या विविध प्रकारांचे निदान करण्यासाठी जीनोमिक सिक्वेंसींगचा प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प सुरू झाला आहे. परिणामी, कोविड विषाणूचे वेगवेगळे व अद्ययावत प्रकार तत्काळ ओळखणे शक्य होते. पालिकेच्या आरोग्य विभागात क्षयरोग निदान संदर्भात अशाच प्रकारचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे विचाराधीन आहे. त्यामुळे आरोग्य विभागास क्षयरोग विषाणूची विशिष्ट व अचूक आवृत्ती आणि त्याचे उत्परिवर्तन शोधण्यात मदत होईल. त्यामुळे क्षयरुग्णांच्या उपचारास योग्य दिशा प्राप्त होईल. अशा प्रकारची जीनोमिक माहिती विशेषतः गंभीर संसर्गजन्य रोगांबाबत पालिकेच्या आरोग्य विभागास जलद आणि प्रभावी निर्णय घेण्यास मदत करेल.

अयाती डिव्हासेस प्रायव्हेट लिमिटेड: या स्टार्टअपने एक नवीन न्यूरोथेरपी स्क्रीनर उपकरण विकसित केले आहे, जे ‘मधुमेहपूर्व’ टप्प्यात मधुमेहाच्या रुग्णांची लवकर तपासणी करण्यात मदत करते. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या संदर्भात पाय विच्छेदनाची परिस्थिती टाळता येईल. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये या उपकरणाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे.

आयु डिव्हासेस प्रायव्हेट लिमिटेड: आयु डिव्हासेस यांनी ‘ब्लूटूथ सक्षम स्टेथोस्कोप’ हे नाविन्यपूर्ण उपकरण तयार केले आहे. डॉक्टरांना रूग्णांचे निरीक्षण करण्यासाठी शरीराच्या इच्छित अवयवांवर स्टेथोस्कोप ठेवण्यास आणि संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत सुरक्षित अंतर राखण्यास या आधुनिक उपकरणाची मदत होणार आहे. कारण, ब्ल्यूटूथ हेडफोनद्वारे डॉक्टरांना निरीक्षण ऐकण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे सदर उपकरण स्वयंचलितपणे प्रत्येक रुग्णाची माहिती मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे नोंदवते आणि संग्रहीत करते. परिणामी, हस्तनोंदींची गरज दूर होऊन वेळेचीदेखील बचत होते.

बायोनिक होप प्रायव्हेट लिमिटेड: या स्टार्टअपने प्रगत कृत्रिम हात तयार केलेला आहे, जे इतर पर्यायांच्या तुलनेत अधिक नैसर्गिक आणि मुक्त-हालचाल करण्यास मदत करतात. हा कृत्रिम हात प्रायोगिक चाचणीकरिता पालिकेच्या रुग्णालयांमध्ये नोंदवलेल्या रुग्ण आवश्यकतेनुसार उपलब्ध व्हावा म्हणून स्माईल कौन्सिल व्यवस्था करीत आहे.

इमर्जी एनव्हायरो प्रायव्हेट लिमिटेड: मुंबई महानगरासाठी घनकचरा व्यवस्थापन (जैविक कचरा तसेच कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती), पाणी आणि सांडपाणी या विषयांमध्ये व्यवस्थापन करण्यासाठी हे नवउद्यमी कामकाज करणार आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content